News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील भारतीय जनता पार्टीचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयात व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी या विकृत मानसिकेत्याच्या व्यक्तीने कुणबी समजाबद्दल आक्षेपार्थ विधान केले होते. त्यामुळे सकल कुणबी समाजाच्या भावना दुखावल्या आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील गावागावात संतापाची लाट पसरली आहे. याचे लोन आता चंद्रपूर जिल्ह्यासह नागपुरातही पसरले आहे. कुणबी समाज बांधवाकडून निषेध करण्यासाठी आयोजन केल्या जात आहे. त्यामुळे कुणबी प्रचंड तापले आहे. असे चर्चेतून बोलने ऐकायला येत आहे.
तरी देखील अजूनही भाजप कडून कोणतीही कारवाई न करता सुधीर साळी यांची पाठराखण केल्या आत असल्याचे आरोप होताना दिसून येत आहे. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवडणूक मतदार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचे मतदार असून त्यांचीही निर्णायक भूमिका ठरणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
कुणबी समाजाबद्दल अर्वाच भाषेचा वापर केल्या प्रकारचे वृत्त काल संपूर्ण राज्यातील कुणबी बांधवांमध्ये हवे सारखे पसरताच भाजपा प्रती संताप व्यक्त होऊन कुणब्यांमध्ये एक जुटीची भावना निर्माण झाली व काल ता. ५ रोजी रात्री ७ वाजता वणी येथील कुणबी समाज भवनात सकळ कुणबी बांधवांची बैठक घेवून निषेध नोंदविण्यात आला आणि सरळ शेकडो समाज बांधवांनी पोलिस स्टेशन गाठून दोषींवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्यापही भाजप कडून त्यांचेवर कोणतीही कारवाई केली नसून त्यांची पाठराखण करीत या प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी मोठी खटाटोप केल्या जात आहे. त्याच बरोबर भाजपाचे कुणबी पुढाऱ्याना हा प्रकार घडलाच नाही असे बोलण्यासाठी वरिष्ठांकडून प्रचंड दबाव आणल्या जात असल्याची माहिती आहे.
एकांदरी कुणबी समाजाबद्दल असलेला सवर्ण जातीचा रोष बाहेर आल्यामुळे कुणबी समाजात मोठी संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे वणी विधान सभेचे आ. बोदकुरवार यांच्या देऊळ पाण्यात आले आहे.याच बरोबर या प्रकाराने देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, व सुधीर मुनगंटीवार याचेही मतदार संघात मोठ्या प्रमाणात कुणबी बांधव असल्याने त्यांची चांगलीच उठबस सुरू झाल्याची माहिती आहे.