हजारो कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने शहरातील रस्ते झाले जाम
महाविकास आघाडी करून शिवसेनेचे संजय देरकरांची उमेदवारी दाखल
News Today
वणी :- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीतील आज नामांकन दाखल करण्याची शेवटच्या दिवशी आज महाविकास आघाडी कडून शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांनी नामांकन आपला नामांकन (उमेदवारी) अर्ज दाखल केला आहे. यावेळी आयोजित महारॅलीने विरोधाच्या डोळ्याची झोप उडाली आहे. रॅलीतील हजारो सहभागी कार्यकर्तेच्या जल्लोशाने वणी शहरातील तमाम रस्ते जाम करून सोडल्याने केवळ संजय देरकर यांचीच चर्चा सुरू झाली.
महारॅलीने झालेले रस्ते जाम
होवू घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या २० नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपली आज अखेरच्या दिवशी उमेदवारी भरली यात आज शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांनी आपले शक्ती प्रदर्शन करून मोठ्या थाटात आपली उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आयोजित नामांकन महारॅलीत उफाळून आलेल्या गर्दीमुळे विरोधकांवर मात्र डोक्याला हात मारून घेण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे आज संपन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या महारॅलीने भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मात्र झोप उडाली आहे. भाजपच्या गोठ्यात मात्र माहाविकास आघाडीची जोरदार चर्चा सुरू आल्याची माहिती आहे.
. मनोगत व्यक्त करताना खासदार संजय देशमुख
महाविकास आघाडी प्रणित शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार संजय देरकर यांची नामांकन महारॅली ही दुपारी जत्रा मैदानातून निघून दीपक टॉकीज चौक, शहीद भगतसिंग चौक, गांधी मार्केट, खाती चौक, छ. शिवाजी महाराज चौक व शासकीय मैदानावर जावून देरकर यांनी आपला नामांकन दाखल केले व प्रचार सभा घेण्यात आली.
मनोगत व्यक्त करताना माजी आमदार वामनराव कासावार
यासभेत अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावर, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख संजय निखाडे, प्रा टिकाराम कोंगरे.डाँ महेंद्र लोढा, राकापचे विजय नगराळे, दिलीप भोयर, माकप चे ऍड दिलीप परचाके, ऍड कुमार मोहरामपुरी.. मनोज काळे राजीव येल्टीवार. राजीव कासावार , अरुणाताई खंडाळकर , संध्याताई बोबडे, वंदनाताई आवारी, गीताताई उपरे, योगिताताई मोहाड, डिमनताई टोंगे, यांचेसह महाविकास आघाडीचे अनेक मान्यवर उपस्थित होते, ह्यावेळी सभे चे संचालन प्रवीण खानझोडे तर आभार सुनील कातकडे यांनी केले.
सभेला संबोधित करताना प्रा. काँगरे सर