अमरावती येथील लाच लुचपत विभागाची कारवाई
News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी यांना आज गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान ७० हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्या गेल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दणानुक गेले आहे. सदर कारवाई ही अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याची माहिती आहे.
तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष उईके यांनी कंट्रोल डीलर बंडू देवाळकर चिखलगाव यांना राशन दुकानाच्या कामासाठी ७० हजार रुपयाची लाच मागितली होती. यावरून बंडू देवाळकर यांनी संतोष उईके यांची लाच लुचपत विभाग अमरावती यांचेकडे तक्रार दाखल केली असता लाचलुचपत प्रतिबंधक अमरावती विभाग यांनी आज व्यवस्थित सापळा रचला व त्यानुसार संतोष उईके यांना तहसील कार्यालयातच ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. त्यांना अटक करून पुढील कारवाईसाठी शासकीय विश्रामगृह येथे आणण्यात आले होते.