Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकार्यकारी अभियंता सा. बां. विभाग दिव्याच्या .... खालीच अंधार, पांढरकवाडा...

कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग दिव्याच्या …. खालीच अंधार, पांढरकवाडा येथे व मुकुटबन रोडवर झाडे रस्त्यावर कोसळलेली; अपघात होऊनसुद्धा प्रशासन शांत

 

News Today

पांढरकवडा (जि. यवतमाळ) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोरच एक झाड दोन दिवसांपासून रस्त्यावर कोसळून पडले आहे. विभागाच्या कार्यालयासमोरच ही घटना घडलेली असतानाही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब चिंतेची असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

दुसरीकडे, मुकुटबन रोडवर नेरड गावाजवळ मागील आठ दिवसांपासून झाड कोसळून रस्त्यावर अडथळा निर्माण करत आहे. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वी या झाडामुळे दोन दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाले आहे. ही घटना घडूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

रस्त्यावर कोसळलेली झाडे वाहनधारकांसाठी मोठा धोका ठरत असून, पावसाळ्याच्या काळात दृश्यता कमी असल्यामुळे अपघातांची शक्यता आणखी वाढत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशासनाने तातडीने ही झाडे हटवून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत, अन्यथा जनतेच्या सुरक्षिततेबाबत उदासीन असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter