Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeNewsनीलजाई ओपन कास्टचे खाण प्रबंधक प्रतापसिंग पवार यांची E7 ते E8 जनरल...

नीलजाई ओपन कास्टचे खाण प्रबंधक प्रतापसिंग पवार यांची E7 ते E8 जनरल मॅनेजरपदी पदोन्नती

News Today

वणी : नीलजाई ओपन कास्टचे आदरणीय खाण प्रबंधक मा. श्री. प्रतापसिंग पवार यांची E7 वरून E8 जनरल मॅनेजर पदावर पदोन्नती झाल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतापसिंग पवार यांनी नीलजाई ओपन कास्टमध्ये कार्यरत असताना उत्पादनवाढीसह खाण व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केली. खाणीत आल्यानंतर झिरो ऑक्सिडेशन, उत्पादनातील अव्वल स्थान तसेच वार्षिक टार्गेटपेक्षा अधिक उत्पादन साध्य करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. खाण उत्पादनवाढीसाठी सातत्याने कार्यरत राहून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

पवार यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे अधिकारी आणि कामगारांशी असलेले त्यांचे आपुलकीचे संबंध. शांत, संयमी, प्रेमळ आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे ते सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. कामगारांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला.

त्यांच्या प्रामाणिक मेहनतीची आणि कर्तृत्वाची दखल घेत त्यांना मिळालेली ही पदोन्नती म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे. एका मराठी माणसाने एवढ्या मोठ्या पदापर्यंत मजल मारणे ही अभिमानाची बाब असल्याचेही अभिनंदनकर्त्यांनी म्हटले आहे.

पवार यांच्या सामाजिक बांधिलकीचेही कौतुक होत असून, अनाथ आश्रमाला त्यांनी दिलेले सातत्यपूर्ण सहकार्य त्यांच्या सेवाभावाची आणि माणुसकीची साक्ष देणारे असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, त्यांच्या पदोन्नतीनिमित्त सुंदरनगर, ता. वणी, जि. यवतमाळ येथील मोहन वैद्य यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पवार यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समाधान लाभावे तसेच त्यांच्या कर्तृत्वाने मराठी माणसाचा गौरव अधिक उंचावावा, अशा सदिच्छाही व्यक्त करण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter