Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedवणी नगर परिषदेत प्रभाग १ कडून माजी नगरसेवक प्रकाश पिंपळकर यांना पुन्हा...

वणी नगर परिषदेत प्रभाग १ कडून माजी नगरसेवक प्रकाश पिंपळकर यांना पुन्हा संधी? मतदारांचा कल सकारात्मक

News Today 

वणी – नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधील राजकीय वातावरणाला आता वेग येऊ लागला असून माजी नगरसेवक प्रकाश पिंपळकर यांच्या पुनर्निवडीबाबत मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे. 

गेल्या कार्यकाळात प्रभागात केलेल्या विकासकामांच्या भक्कम पायावर मतदार पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकण्यास उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे.

आपल्या कार्यकाळात पिंपळकर यांनी रस्ते-विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, ड्रेनेज लाइन सुधारणा आदी अनेक मूलभूत प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले होते. यामुळे प्रभागात दृश्यमान बदल घडून आले होते. विकासाबरोबरच त्यांनी नागरिकांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांवर तत्परतेने काम केल्याने त्यांची ओळख काम करणारा जननेता अशी निर्माण झाली.

प्रभागातील नागरिकांशी त्यांचा दांडगा लोकसंपर्क ही त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठी ताकद मानली जाते. घरोगरी जाऊन केलेली भेट, नागरिकांशी राखलेला स्नेहयुक्त संवाद आणि कोणत्याही समस्येला नकार न देता केलेला पाठपुरावा यामुळे पिंपळकरांविषयी मतदारांमध्ये आजही विश्वासाची भावना टिकून आहे.

आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा संधी देण्याचा कल मतदारांमध्ये दिसू लागल्याने प्रभाग क्रमांक १ मध्ये निवडणूक अधिक चुरशीची आणि उत्सुकतेची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter