संघटनात्मक बळकटीसाठी दिशा ठरवली; सूर्यवीर चिकटे यांची युवक आघाडीच्या वणी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
News Today
वणी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या वतीने आज दिनांक २९ जून २०२५ रोजी वणी येथील शासकीय विश्रामगृहात वणी, मारेगाव आणि झरी-जामनी तालुक्यांची संयुक्त आढावा बैठक अत्यंत उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. विशेषतः युवकांचा सहभाग सर्वाधिक होता, हे या बैठकीचे वैशिष्ट्य ठरले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम होत्या, तर प्रमुख उपस्थिती प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक अफजल फारुकी यांची होती. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक राऊत आणि माजी जिल्हापरिषदेचे अध्यक्ष अशोकराव घारपडकर यांचीही विशेष उपस्थिती होती.
बैठकीत संघटनात्मक घडामोडी, आगामी निवडणुकांचे नियोजन, युवकांचे सक्षमीकरण, स्थानिक प्रश्न यावर सखोल चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर युवक नेतृत्वाला चालना देत सूर्यवीर चिकटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवा आघाडीच्या वणी तालुकाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
बैठकीस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष , शकील अहमद, पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्ष सय्यद अहमद, प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबीद हुसेन, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटन सचिव विजय नगराळे, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष सय्यद शकील, यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत तीनही तालुक्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी एकत्रितपणे पुढे यावे, असे आवाहन केले. विविध वक्त्यांनी स्थानिक अडचणी, युवकांचे नेतृत्व, पक्षवाढ यावर सखोल मते मांडली.
या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत खाडे, जिल्हा सचिव रामकृष्ण वैध, वणी तालुकाध्यक्ष प्रवीण खारकर, मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते, झरी-जामनी तालुकाध्यक्ष प्रमोद थेरे, वणी शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, रामदासजी पखाले, प्रकाश ढवळे , मंगेश धांडे , राकेश मेश्राम, अमोल राऊत, महेंद्र चांदोरे, अतुल पिदुरकर, मंगेश गोरे, मारोती खापणे, व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
अन्वर शेख हयाती यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
वणी येथील काँग्रेसचे तथा सामाजिक कार्यकर्ता अन्वर शेख हयाती यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतल्याने वणी शहरात पक्षाची ताकद आणखी प्रबळ झाली आहे.