News Today
वणी (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक अफजल फारुकी यांच्या प्रमुख उपस्थितीत वणी, मारेगाव आणि झरी-जामनी तालुक्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक रवीवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता वणी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस जिल्हा युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राहुल कानारकर, जिल्हाकार्याध्यक्ष संकेत टोने, महिला प्रतिनिधी नलिनी ठाकरे, प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबीद हुसेन, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटन सचिव विजय नगराळे यांच्यासह तालुक्यांतील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
बैठकीदरम्यान संघटनात्मक घडामोडी, स्थानिक प्रश्न, आगामी निवडणुका, पक्षवाढीची दिशा आणि युवकांचे सक्षमीकरण यावर सविस्तर चर्चा होणार आहे. ही बैठक पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाची असून कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातून पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विभाग प्रमुख, सर्कल प्रमुख, शाखा प्रमुख तसेच सेलचे महिला व पुरुष तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आपल्या कार्यकारिणीसह उपस्थित राहावे, असे आवाहन वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केले आहे. या बैठकीला यशस्वी करण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत खाडे, वणी तालुकाध्यक्ष प्रवीण खारकर, मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते, झरि जामनी तालुकाध्यक्ष प्रमोद थेरे, वणी शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, रामदासजी पखाले आदी परिश्रम घेत आहे.