पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; समाजसेवक विजयबाबू चोरडिया यांचा वणीत आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम
News Today
वणी | २२ जून २०२५
राज्यात अनेक भागांमध्ये पेरणीनंतर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर, वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि गरीब, गरजू नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने, विजय बाबू चोरडिया यांनी कमान चौक, वणी येथे प्रसाद वाटपाचा उपक्रम राबवला.हा कार्यक्रम २२ जून रोजी सकाळी ११ वाजता पार पडला.
विजय चोरडिया हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असून, त्यांनी वणीतील शेकडो गरजू नागरिकांमध्ये प्रसादाचे वाटप केले. या उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांनी पावसासाठी सामूहिक प्रार्थनाही केली.
शेतकऱ्यांचे हाल लक्षात घेता, या प्रकारच्या आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांची गरज अधिकच जाणवते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
विजय बाबू चोरडिया म्हणाले, “राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आमचा हा प्रयत्न देवाच्या चरणी साकडे घालण्यासाठी आहे, जेणेकरून वेळेवर पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांचे संकट दूर होईल. या उपक्रमाने विजय बाबू चोरडिया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.