Monday, January 19, 2026
Google search engine
Homeवणीवणी विभागात उकाड्याचा कहर आणि वारंवार वीजपुरवठा खंडित – नागरिक त्रस्त

वणी विभागात उकाड्याचा कहर आणि वारंवार वीजपुरवठा खंडित – नागरिक त्रस्त

News Today 

वणी, २० मे: वणी विभागात सध्या उकाड्याचा प्रचंड जोर असून, त्यातच वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत. दररोज २ ते ३ तास वीज गायब होत असल्याने व रात्री अनेकवेळा ये – जा करीत असल्याने रहिवाशांचा संताप उफाळून आला आहे.

सध्या तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास पोहोचले असून, विजेअभावी पंखे, कुलर, फ्रिज यांसारखी अत्यावश्यक उपकरणे बंद पडली आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

स्थानिक रहिवासी म्हणाले, “उकाड्याने आधीच जीव नकोसा झाला आहे. त्यात वीज गेल्यावर राहणेही कठीण होते. रात्री झोप येत नाही, दिवसा काही काम होत नाही.”

नागरिकांनी सोशल मीडियावरून वीज वितरण कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कंपनीकडून अद्याप कोणतेही ठोस स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. योग्य नियोजन करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

उकाड्याच्या पार्श्वभूमीवर वणी विभागातील नागरिक वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे त्रस्त झाले असून, प्रशासन आणि वीज वितरण कंपनीने तातडीने लक्ष घालून आवश्यक ती पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter