
News Today
वणी: सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध व्यावसायिक तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सक्रिय सदस्य मंगलाबाबू चिंदालिया (७५ वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने १९ मे रोजी संध्याकाळी ८ वाजता दरम्यान निधन झाले. बरेच दिवस ते आजारी होते.

त्यांची अंत्ययात्रा २० मे रोजी संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. अंत्यसंस्कार वणी येथील मोक्षधाम येथे होणार आहेत.

मंगलाबाबू हे पत्रकारिता, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय होते. विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून सतत आपला सक्रिय सहभाग नोंदवत राहिले.

ते हसतमुख, मनमिळावू व जनसंपर्कात कुशल स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे वणी शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे.



