
News Today
वणी :- तालुक्यातील लालगुडा, सावर्ला, निळापूर आणि कोलार या गावांमध्ये मामा तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज, १ मे रोजी सकाळी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामामुळे ग्रामीण भागातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, तसेच उन्हाळ्यात जनावरांची पाण्याची भटकंती थांबेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तलावाच्या खोलीकरणामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार दरेकर म्हणाले की, लवकरच तलावाच्या सौंदर्यीकरणात भर घातली जाईल, ज्यामुळे परिसराला एक नवीन रूप प्राप्त होईल. त्यांच्या या आश्वासनामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, शरद ठाकरे, संतोष भोंगळे, संजय देठे, संतोष8 कुचनकर, सुनील मोहितकर, मनोज ढेंगळे, लालगुडा ग्रा. पं. सरपंच्या सौ. गीता उपरे, सदस्य वंदना चामटे, पूनम मंदे, विद्या पचकटे, शारदा मेश्राम, रत्नमाला चालखुरे, वैशाली नगराळे, विशाल डुकरे, कुणाल पथाडे उपस्थित होते.

तर सावर्ला येथे सरपंच्या सौ. कुंदा चोपणे, उपरपंच अविनाश सोमलकर, रामदास चोपणे, ऍड. विनोद चोपणे, विठ्ठल तुरणकर, महेश सोमलकर, अरविंद मालेकर, उपस्थित होते. तर निळापूर येथे, सरपंच्या सौ. पूजा बोढाले, उपसरपंच रवींद्र कडसकर, वसंता चटप, विपुल ढवस, प्रवीण चटप, विनोद पारखी, मारोती खामणकर, नामदेव कडुकर, उपस्थित होते. तर सामाजिक कार्यकर्ते अनिल बोढाले यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचलन करून सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कोलेरा येथे ग्रा. पं. सदस्या सौ. काजल बोंडे, दिलीप पिदुरकर, जितेंद्र बोंडे, सचिन टिपले, प्रवीण बांदुरकर, उपस्थित होते.




