News Today
नागपूर :- राष्ट्रीय स्तरावर संत नामदेव महाराज यांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व सामाजिक एकत्रीकरण करिता समोरील वर्षीच्या जानेवारी २०२६ मध्ये नागपूर येथे अतिशय भव्य स्वरूपात संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्या संमेलनाचे नियोजन करण्याकरिता प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ईश्वरभाऊ धिरडे, जेष्ठ समाज सेवक सुभाष खोडे, प्रमोद कोरमकर, डॉ. प्रकाश ढगे, सचिव श्याम नानोटे , सौ.आरती भाईक, विदर्भ नामदेव शिंपी समाजाचे सचिव बोबडे, युवराजजी सुतोने ,अँड. अमोलजी भिसे,अँड. वासुदेव घिमे, माजी सचिव राजेश गंधे, श्री सुनील जावळेकर, प्रा.अनिल भाईक, छिपा शिंपी समाजाचे नीलकमल खैरवार गहलोत,सौ.स्नेहाताई हुकूम, सौ.सुनिताताई जुमळे , वर्षाताई जुमळे , संजय जुमळे,इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
ईश्वर धिरडे यांनी या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता महासंमेलन आपण आयोजित करून शिंपी समाजातील सर्व पोट शाखेला एकत्रित करून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याकरिता आपल्याला हे कार्य करायचे आहे. हे संमेलन भव्य स्वरूपाचे असेल व या संमेलनात शिंपी समाजातील सर्व भारतभरामधून जवळपास पाच लाख समाज बांधव उपस्थित राहतील याबद्दल माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे या सर्वांची राहण्याची कार्यक्रमाचे तयारी आपल्याला कशी करायची आहे याबद्दल मार्गदर्शन केले.
सोबतच युवक महिला या सर्वांनी मोठ्या स्तरावर एकत्रित येऊन या संमेलनाची जबाबदारी स्वीकारावी अशी आवाहन सुद्धा करण्यात आले . त्यानंतर अनेक मान्यवर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संमेलनाविषयी आपले मत व्यक्त केले. आणि सोबतच आपल्या समाजाला राजकीय स्थैर्य प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले.
यावेळी नागपूर शहरातील शिंपी समाजातील सर्व पोट शाखेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सुद्धा आपले विचार प्रगट केले आणि महासंमेलन यशस्वी करण्याचा संकल्प केला.