News Today
वणी :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष्याच्या जिल्हा प्रमुखपदी संजय निखाडे यांची वर्णी लागल्याने एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या हातात जिल्ह्याची सूत्र गेल्याचे सर्वसामान्य शिवसैनिकत आनंद पसरला आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्हाप्रमुखाचे पद निलंबित केल्याने जिल्हाप्रमुख कोण होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागील चार महिन्यापासून यवतमाळ जिल्हा व वणी विधानसभेतील अनेकपदे रिक्त आहेत. जिल्हाप्रमुख पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेकडे अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती यात मात्र उपजिल्हाप्रमुख पदावर मागील अनेक वर्षापासून कार्यरत असलेले संजय निखाडे यांच्या नावाचा जिल्हाप्रमुख पदावर शिक्का मोर्तब झाला.
मागील ३५ वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संजय निखाडे यांची वणी विधानसभेत ओळख आहे. आज त्यांच्या निवडीने सर्व सामान्य शिवसैनिक मात्र आनंदी झाला आहे. निखाडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे,जिल्हा संपर्क प्रमुख गायकवाड, आमदार संजय देरकर यांना दिले आहे.