Tuesday, April 29, 2025
Google search engine
Homeवणीवणी येथे २३ मार्च शहीद दिनी तथा साहेबराव व मालती करपे स्मृती...

वणी येथे २३ मार्च शहीद दिनी तथा साहेबराव व मालती करपे स्मृती प्रित्यर्थ महा जेलभरो आंदोलन ,

हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी श्रीगुरुदेव सेनेचे आवाहन

News Today 

वणी :- शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या स्व. साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती करपे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनाचे निमित्याने शेतकरी शेतमजूर, निराधार व दिव्यांग्यांच्या विविध मागण्यासाठी श्रीगुरुदेव सेनेने लक्षवेधी महा जेलभरो आंदोलनाचे आयोजन रविवार ता. २३ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजता येथील पोलीस स्टेशनमध्ये आयोजित केले आहे.

या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक आमदार संजय देरकर हे उपस्थित असणार असून श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात संपन्न होणार आहे. 

या आंदोलनाला प्रमुख उपस्थितीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) च्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा निकम, यवतमाळ जिल्हा बँकेचे विभागीय अध्यक्ष राजू येल्टीवार, राकाँपचे राज्य संघटक सचिव विजय नगराळे, वणी विधानसभाध्यक्ष सूर्यकांत खाडे, शेतकरी नेते देवराव धांडे, कलावंत संघटनेचे विदर्भ अध्यक्ष रामदास पखाले, आदी मान्यवर उपस्थी असणार आहे. सदर आंदोलनात खालील मागण्या करण्यात येणार आहे. यातील सर्व निराधार , लाडकी बहीण कलावंत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहिना मानधन ५ हजार करण्यात यावे, निराधारांच्या उत्पन्नाची अट २१ हजारावरून १ लाखापर्यंत करण्यात यावी,

निराधारांचे वय ६० वर्षे करण्यात यावे, सर्व कलावंताच्या मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मान्य करावे, निवडणुकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ई व्ही एम बंद करण्यात याव्या, शेतकऱ्याच्या शेती साहित्य (बी- बियाणे,रासायनिक खते, औषधे व शेती अवजारे) या वरील जी. एस. टी. रद्द करण्यात यावी.

वणी शहरातील राज्य मार्ग क्रमांक ३१५ च्या रस्ता बांधकामाचे तांत्रिकदृष्ट्या ऑडिट करण्यात यावे , सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी,शेतमजूर १२ बलुतेदार यांची ( मायक्रो फायनान्स, पतसंस्था,खाजगी सावकार, बँकांचे कर्ज ) यातून सर्वांना कर्ज मुक्त करावे, शेती पंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा , शेतकऱ्याच्या कापसाला किमान १२ हजार रुपये, सोयाबीनला ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांना १० हजार रुपये मासिक बेरोजगार पत्ता देण्यात यावा,

शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, वणी येथील कोळशाची रेल्वेसाठी हटविण्यात यावी आदी मागण्या करण्यात येणार आहे. या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी, कलावंतांनी , दिव्यांग्यानी व निराधारांनी हजारोच्या संख्येने उपस्थित आव्हान करण्यासाठी श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले.

 हे आंदोलनासाठी चंपतज पाचभाई,बाबाराव कुळमेथे, मधुकर वाभीटकर,विजय आस्कर, मारुती पाटील खापणे, सौ.रत्‍नाबाई पारखी, निर्मलाबाई मडावी, राजू झाडे,वसंतराव कोहळे, अमोल वाघाडे, शिवाजीराव डाखरे, सचिन वाभीटकर, विलास काळे,अरविंद येसेकर,ज्ञानेश्वर कोडापे, सिंधुबाई गोरे, पुंडलिकराव कोंगरे, सौ संगीताताई सातपुते, रंगरावजी भोयर,शोभाताई तुरा नकर, भाऊराव दुरटकर, मेघबाई भगत, बालाजी गुरनुले, पंचफुलाबाई मंगाम,शकुंतला हनुमंते, मंगलाताई मडचापे, अर्चनाताई कातकडे, राजूभाऊ सिडाम, गंगाधर महाराज लोणसावडे, सुभाषजी पानघाटे,सुहास सप्रे, दिगांबर कुमरे, संभाजी पारशिवे, राकेश कापनवार आदी परिश्रम घेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter