News Today
वणी:- येथील पोलीस स्टेशन मध्ये मागील अनेक वर्षापासून कितपत पडलेल्या सुमारे ९० बेवारस वाहनांचा तारीख १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लिलाव होणार असल्याची माहिती पोलिस विभाकडून देण्यात आली आहे.
विविध ठिकाणावरून जप्ती करण्यात आलेली एकुण ९० बेवारस मोटार वाहनांचा उपविभागीय दंडाधिकारी वणी यांचे आदेश क्रमांक/ म. सहा. उविदं/गृहशाखा/2025 दिनांक 15/02/2025 अन्वये /पोलिस विभागाला नियमाप्रमाणे लिलाव करण्याची अनुमती मिळाली आहे.
सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की, दिनांक 19/03/2025 पुर्वी कोणास काही मालकी हक्क सांगावयाचा असेल त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन वणी येथे वाहनाची मुळ कागदोपत्री/दस्तऐवजासह हजर यावे. जर मुदतीत कोणीही योग्य हरकती न दाखविल्यास बेवारस वाहनांचा नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल, त्यानंतर कोणतेही आक्षेप/हरकत नोंद्र घेण्यात येणार नाहीं असे आवाहन करण्यात आले आहे.