News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील पोलिस स्टेशनचे काही वादग्रस्त कर्मचारी वाळू तस्करीत गुंतून असल्याची तक्रारदाराला खोट्या ॲट्रोसिटीत अडकविण्याची धमकी दिल्याने या धमकीची धास्ती पकडल्याने ललित लांजेवार यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे तर्क काढल्या जात आहे.
यातच वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी यांची तडका फडकी बदली करण्यात आली परंतु “खाकी ” च्या आढून घादाड धंदे करणाऱ्या वाळू माफियांचे काय ?असा प्रश्न अजूनही कायम आहे. असून केवळ ठाणेदाराच्या बदलीने मृत ललित यांना न्याय मिळणार आहे का? नसेल तर तो मागावा तरी कुणाकडे असे बोलण्याची वेळ वणीकरांवर निर्माण झाली आहे.
वणी परिसरात सर्रास वाळू तस्करी केल्या जात असून यात मोठ मोठे मासे अडकलेले आहे. यातच राजकीय व गुंड वृत्तीचे लोक वाळू तस्करीत सहभागी असून यात आता पोलीसात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आपले हात रोवले आहे. कायद्याचे रक्षकाच आता वाळू भक्षक झाल्याने वणी पोलिसांची कर्तव्य दक्षता वेशीला टांगली आहे.
वाळू तस्करीत पोलिसांच्या हात असून या प्रकरणाची रीतसर तक्रार शिवसेना (शिंदेगट) शहराध्यक्ष स्व. ललित लांजेवार यांनी केली असता काही पोलिसांनी जाती वाचक शिवी गाळ कायद्याचा फायदा घेत ललित लांजेवार यांना अडकविण्याची धमकी वारिष्ठांसमोर दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
चोर तर चोर वरून शिरजोर होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर स्व. ललित लांजेवार यांना धमकी मिळाल्याने ललित यांनी या धमकीची चांगलीच धास्ती घेतली होती. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागयला सुरवात झाली होती. रात्री अचानक त्यांच्या हृदयात मोठ्या प्रमाणात दुखून आल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. परंतु रुग्णालयातच त्यांना मृत्यूने कवटाळले.