धनोजे कुणबी समाज संस्था वणी तर्फे आमदार देरकर यांचा सत्कार सोहळा संपन्न
News Today
वणी:- कुणबी हा कष्टकरी समाज असून या समजाची शैक्षणिक व उधोगील प्रगती करण्यासाठी आता माझी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे मी सदैव त्यासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही येथील धनोजे कुणबी समाज संस्थेच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांचा सत्कार ता. १६ रोजी समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
धनोजे कुणबी समाज संस्था वणी द्वारा दिनांक १५ व १६ जानेवारी २०२५ रोजी श्री सद्गुरू जगन्नाथ महाराज मुर्ती स्थापना दिवस सोहळा संपन्न झाला.बुधवार दिनांक १५ जानेवारी ला सायंकाळी ठीक ७:०० वाजता वारकरी भजन मंडळ वणी तर्फे भजनाचा कार्यक्रम तसेच गुरूवार दिनांक १६ जानेवारी ला ध्यान पाठ व भजन, श्री चा पालखी सोहळा, घटस्थापना व श्री च्या मुर्तीचा अभिषेक, तसेच वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर व चिखलगाव ग्रामपंचायत च्या सरपंच मा. रूपाली ताई कातकडे, एकविरा महिला पतसंस्था मारेगावच्या अध्यक्षा सौ. किरणताई देरकर, चिखलगाव चे उपसरपंच सुनिलभाऊ कातकडे यांच्या जाहीर सत्कार घेण्यात आला.
त्यानंतर गुरूदेव सेवा भजन मंडळ यांचा कार्यक्रम, ह.भ.प. मनुमहाराज तुगनायत यांचे प्रवचन, दही हांडी काला व महाआरती, भजन संमेलन, महाप्रसाद व समारोपीय भजन आरती असा दिवसभराचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मंगेश रासेकर हें होते प्रास्ताविक नामदेवराव जेनेकर सर सुत्रसंचलन अंबादास वागदरकर सर तर आभारप्रदर्शन अनिलकुमार टोंगे सर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव रामरावजी लेडांगे उपाध्यक्ष प्रमोद वासेकर कोषाध्यक्ष रामरावजी गोहोकार प्र. मार्गदर्शक अभय पानघाटे संचालक मा . कुंडलिक ठावरी . मा . भास्करजी सोमलकर . नितीन मोवाडे सर ,सुरेशराव राजूरकर , राघवेंद्र जी कुचनकर मा. राजेश पहापळे ,शैलेशजी ढोके , शांताराम जी राजूरकर , आशिष मोहीतकर ,अँड घनश्याम निखाडे , घनश्यामजी चोपने , योगा समितीचे सदस्य. दिगंबरजी गोहोकर , सुरेश रायपूरे , जयप्रकाश जी राजूरकर ,
समाजभवनाचे व्यवस्थापक कवडु नागपुरे व किशोर मिलमिले, वसंतराव उपरे , सुधाकर गारघाटे, , गुलाबराव आवारी , नरेंद्र मिलमीले , नारायण पा.ढवस , भैय्याजी तेजे ,प्रभाकर गौरकर , सौ प्रियंका मंगेश रासेकर ,रामचंद्र पिपराडे , नरेंद्र चिकटे , राजेन्द्र विधाते , विलास बिलगैय्ये , संजय बोंडे , हार्दिक किनाके,सौ.शारदाताई गोहोकार ,सौ काजल नागपूरे , उपस्तीथ होते.