पोलिस उपअधिक्षक व ठानेदारांच्या बदलीसाठी शहरात ” कुट” नीतीचा वापर करतो तरी कोण ?
News Today (दिलीप भोयर)
वणी :- केंद्रात व राज्यात राजकीय सत्ता असताना देखील काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून धार्मिक संघटनेला सामोरं करून आपला उल्लू शिकविण्याचा कट रचून प्रशासनाला वेठीस पकडून शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित करण्याचा घाट रचीयता कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला असून कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या बदलीसाठी तर हा खटाटोप केल्या जात नाही ना? अश्या चर्चेला आता शहरात उत आला आहे.
वणी शहरात मागील अनेक वर्षापासून प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव मोठ्या थाटा माठात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या धार्मिक संस्थेकडून आज पर्यंत कोणताही वादात आपला सहभाग नोंदविला नाही. परंतु मागील काही दिवसांपासून ही धार्मिक संस्था शहरातील विविध प्रश्नांवर प्रशासनाला निवेदन देवून वेठीस धरण्याचे कार्य करीत असल्याचे निदर्शनात येत आहे.
यामुळे शहरातील शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे ऑटो चालक, प्रवाशी वाहतूक करणारे ऑटो चालक, तसेच विद्यार्थ्यांच्या वाहनांवर नाहक कारवाईचा बळगा उठविल्या जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या भुर्दंड सहन करावा लागत आहे.
एकीकडे प्रशासनातील अधिकारी वर्ग जर राजकीय पदाधिकाऱ्यांचे ऐकत नसेल किंवा त्यांच्या उचीत मागण्याची दखल घेत नसतील तर सत्ता असताना आंदोलनाची व अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याची गरज का? सरळ सरळ संबंधित विभागाच्या मंत्रालयातील मंत्र्यांकडे जावून संबंधित अधिकारी कर्मचारी यांची चौकशी बसवून त्यांचेवर कारवाई करणे अत्यंत सोपी व साधी पद्धत असताना देखील रस्त्यावर उतरून आपल्या सत्तेचे धिंडवळे काढण्याची वेळ या सत्तेतील पदाधिकाऱ्यांवर का आली असेल या बाबीचे चिंतन करण्याची वेळ निर्माण झाली आहे.
धार्मिक संघटनेतील कार्यकर्ते अत्यंत साधे आणि भोळे असतात त्यांना राजकीय कावे प्रथमतः समजून येत नाही. त्यांच्या धार्मिक भावनेचा वापर सत्ता पक्षातील पदाधिकारी आपली पोळी शेकून घेण्यासाठी करून तर घेत नाही ना अशी शंका आता या कार्यकर्त्यांना भेडसावून राहिली आहे. त्यामुळे या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मनसुबे उघड पडत आहे. या कपटी व धूर्त पदाधिकाऱ्याकडून शहरात अनुचित प्रकार घडवण्याचा घाट रचल्या तर जात नाही ना?
मागील दहा वर्ष वणी विधानसभा क्षेत्र भाजपाचा ताब्यात असताना या धार्मिक संघटनेने कधीच तोंड वर केले नव्हते. आणि कोणतीही समस्या त्यांना दिसून येत नव्हती. आज निवडणुकीत पराभव मिळताच हे पदाधिकारी धार्मिक संघटनेला समोर करून शहरातील शांतता व सुव्यवस्था भंगवू पहात तर नाही ना? असा प्रश्न वणीकरांच्या समोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या धार्मिक संघटनेचा बोलविता धनी आहे तरी कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका माजी लोकप्रतिनिधींचे चोचले पुरविणे अधिकाऱ्यांनी बंद केले आहे. त्यामुळे हा माजी लोकप्रतिनिधी पदावर असताना चिरीमिरीत आपले कर्तव्यदक्षता बासणात गुंडाळून ठेवत होता आणि आता मात्र राम नाम जपना ओर पराया माल अपना करण्यासाठी धार्मिक संघटनेच्या आडून शहरात अशांतता पसरवून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागे असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.