News Today
वणी :- तालुक्यातील कृष्णानपुर येथील जिजाऊ महिला बचत गट तर्फे दि. १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच अंकुश ठावरी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठित नागरिक बंडू लांडे निखाडे गुरुजी, अमोल ढेंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ अर्चना कातकडे जिजाऊ महिला बचत गट अध्यक्ष सौ गोदावरी अमोल ढेगळे, आशा सेविका तसेच जिजाऊ महिला बचत गट सचिव कीर्ती निलेश लांडे, मंगला नेताजी जुनगरी. अश्विनी राजू लांडे आदींनी परिश्रम घेतले.