गोहत्यांतील सर्व आरोपींचे मूळ तपासून कारवाई करा – आ. संजय देरकर
दिलीप भोयर
वणी : – शहरातील दिपक टॉकीज परिसरातील काटेरी झुडपाच्या घनदाट परिसरात कुंटनखाण्याजवळ टिन पत्र्याचे शेड उभारून त्यात मागील अनेक वर्षापासून गोहत्या करून त्यांचे मास तस्करी केल्या जात असल्याच्या प्रकार आज तारीख ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे. गोहत्या केलेल्या गायींचे मुंडके व मास आढळल्याने संपूर्ण वणी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी उघडकीस आणला आहे.
जत्रा मैदानातील तलाव समोरील नव्याने उभारण्यात आलेल्या मटण मार्केट मागील बाजूस प्रचंड मोठ्या जागेवर ऑस्ट्रेलियन काटेरी बाभुळींचे झाडे आहेत. त्या झाडांच्या आडोश्याचा फायदा घेत गोमांस तस्करांनी टिन पार्टीचे मोठे शेड उभारून त्यात गोहत्या करून त्यांचे मास बाजारात विक्री करीत होते. त्या शेड परिसरात शेकडे गायींचे कुजलेले मुंडके, हाडे, व जनावरांच्या पोटातील फेकावू वस्तू तसेच चांबडे आढळून आले आहे.
या गंभीर प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी , नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली व यात जनावरांचे अविध्य बुचडखाणा चालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्या परिसरितल सर्व अवैध्य बुचडखणा बल्डोजरणे तोडून काढला हा बुचडखाना मागील अनेक वर्षापासून चालू असल्याची चर्चा आहे. हा बुचाडखाणा सत्तेतील राजकीय आश्रयाखाली चालू असून यात अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता वाढली आहे.
गोहत्या बंदी कायदा असताना गोहत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब – आ. संजय देरकर
महारष्ट्र राज्यात गोहत्या बंदी कायदा असताना देखील गोहत्या करून गोमांस तस्करी केल्या जात असल्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेतील कोणत्याही आरोपीला पोलिसांनी आश्रय देवू नये किंव्हा कारवाईसाठी हायगत करू नये. या घटनेतील मूळ आरोपींचा शोध घेवून सक्त कारवाई करण्यात यावी असे आमदार संजय देरकर यांनी घटास्थळी भेट देवून पोलिसांना ठणकावून सांगितले. यावेळी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, राजू तुरणकर, संजय देठे, भगवान मोहिते आदी शिवसैनिक उपस्थित होते.
गो- मास तस्कारीतून ही चिरीमिरी खाणारा तो लोक प्रतिनिधी कोण? अखिल सातोकर यांच्या आरोपाने खळबळ
मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सत्तेतील एका माजी लोकप्रतिनिधींच्या (मामा) आशीर्वादाने हा प्रकार सुरू होता ही तस्करी करण्यासाठी तस्कराकडून लाखो रुपयांचा मासिक हप्ता त्यांना मिळत होता व या तस्करांसोबत या मामा नामक माजी लोकप्रतिनिधींनी शहरातील एका तारांकित हॉटेल मध्ये डील केल्याच्या मोठा गंभीर आरोप नगर परिषदेचे माजी नगर सेवक अखिल सातोकर यांनी वणी न्युज टुडे जवळ बोलताना केल्याने या मामाचा बुरखा मात्र टरटर फाटल्याने प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे.