News Today
वणी :- शहरातील छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम तथा मराठा सेवा संघ या दोन्ही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चळवळीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 जानेवारी २०२५ रोज शनिवारला वणीतील धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक सभागृह येथे सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर येथील लाइफलाईन ब्लड बँकेच्या माध्यमातून या सामाजिक उपक्रमाला सुरुवात होईल. सकाळी 11 वाजता राष्ट्रमाता जिजाउंच्या प्रतिमेस माल्यार्पण करून रक्तदान शिबिरास प्रारंभ होईल. मराठा आरोग्य कक्षाचे प्रमुख अरुण डवरे यांच्या नेतृत्वात आयोजित या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादासजी वागदरकर, सचिव नितीन मोवाडे, विधी सल्लागार एड.अमोल टोंगे, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचे उपाध्यक्ष अशोक पिंपळशेंडे, सचिव मंगेश खामनकर, यांनी केले आहे.
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी संचालक भास्कर दुमोरे,मारोती मोडक, विवेक गाडगे,मारोती जिवतोडे, विनोद बोबडे, दत्ता पुलेनवार,संजय जेऊरकर,प्रदीप बोरकुटे,दिलीप वागदरकर,अजय धोबे यांनी केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम तथा मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.