Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeवणीसीताफळ शेतीने दाखवली शेतकऱ्यांना प्रगतीची कास,  नगद पीक आणि आर्थिक भरभराटी, देश...

सीताफळ शेतीने दाखवली शेतकऱ्यांना प्रगतीची कास,  नगद पीक आणि आर्थिक भरभराटी, देश विदेशात मोठी मागणी

News Today ( दिलीप भोयर)

सोलापूर :- पारंपरिक शेतीने शेतकऱ्यांना डबघाईस आणले आहे. त्यामुळे पच्छिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला पूर्ण विराम देवून फळबाग शेतीकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये आर्थिक भरभराटी आली आहे. अश्याच एका सीताफळ शेतीचा घेतलेला आढावा. 

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव पुर्णतः सिंचनाने व शेती विकासाने फुललेले गाव आहे. या गावातील शेतकऱ्याच्या शेतात कोणती ना कोणती फळबाग आहे. या दाळींब, पेरू, शेवगा, दाक्ष, कलिंगड,सीताफळ आणि ऊस हे प्रमुख पीक आहे. यावर त्यांचे वार्षिक नियोजन आहे. अश्याच एका युवा शेतकऱ्याने आपल्या शेतात ९ एकर जागेत सीताफळ शेती लागवड केली आहे. येवढी मोठी फळ करणाऱ्या या युवा शेतकऱ्याचे नाव सागर वागमोडे आहे.

शेती म्हणजे अपार कष्ट आणि परिश्रमाचा व्यवसाय आहे. त्यातही निसर्गाच्या भरोष्यावर अवलंबून राहावे लागते. कधी निसर्ग शेतकऱ्यांची कंबर मोडतो तर कशी सरकार बाजार भाव पाडून त्यांच्या श्रमाला मातीमोल करतो. अस्मानी आणि सुलतानी हे दोन्ही संकट शेतकर्यांचा डोक्यावर दररोज घिर्ड्या घालत असते.  या संकटातून कसा बसा शेतकरी वाचला तर त्यावर सरकारी संकट शेतकऱ्यांना सोडत नाही. त्याने जगावे तर कसे जगावे असा प्रश्न त्याच्या समोर सदैव असतो.

प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असते की माझ्या शेतातील शेतमालाला योग्य दर मिळाला पाहिजे. सर्व खर्च वजा करून दोन पैसे नफा म्हणून शिल्लक असायला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांच्या शेतातील माल बाजारात जाण्यासाठी सज्ज असला की सरकार मात्र शेतमालाची निर्यात थांबवून तो माल आयात करून शेतकऱ्यांना तोंडघशी पाडतो. त्यामुळे पारंपरिक शेती व शेतकरी हा उद्ध्वस्त होत आहे. 

अश्या पारंपरिक शेतीवर मात करण्यासाठी शेतकरयांना पर्याय म्हणून फळबाग शेती अत्यंत उपयुक्त ठरत आहे. म्हणून पच्छिम महाराष्ट्रातील शेतकरी फळबाग शेतीकडे वळले आणि शेतीची काया पलटून दाखवली जिद्द आणि परिश्रम असेल की मातीतून मोती पिकविता येत आणि मोत्यातून उन्नती करत येत म्हणून या भागातील शेतकऱ्यांमध्ये कर्जबाजारी पणाने आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. शेतीला सिंचनाची साथ मिळाली की त्यातून वर्षभर उत्पन्न मिळविण्याची धम्मक असली की त्याची प्रगती निच्छित होते हे या भगातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे.

अश्याच होतकरू एका मारकडवाडी येथील होतकरू युवा शेतकरी सागर शंकरराव वाघमोडे पाटील यांनी  ७ एकर शेतीत सीताफळाची बाग लागवड केली आणि बघता बघता या सीताफळ बागेतून दरवर्षी लाखोचे उत्पन्न मिळवले. या सिताफळांना राज्यातच नाही तर केरळ, कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा या भागात मोठी मागणी असून विदेशात देखील प्रचंड मागणी आहे. बांगलादेश व नेपाळमध्ये देखील या फळांची निर्यात केली जाते.

त्यामुळे पारंपरिक शेतीला पूर्ण विराम देवून जे पिकते ते पिकवित बसण्यापेक्षा जे बाजारात खपते ते पिकविण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकरी फळ बागेकडे वळला आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न घेवून आपले अर्थिकता बळकट करीत आहे. हीच गरच विदर्भातील शेतकऱ्यांची आहे. 

फळबाग शेती शरदचंद्र पवार साहेबांची देणं

पारंपरिक शेतीने शेतकरी पुर्णतः उद्ध्वस्त होताना दिसून येत आहे. त्यासाठी शेती आणि शेतकरी वाचला पाहिजे यासाठी या भागातील तत्कालीन खासदार तथा देशाचे कृषीमंत्री शरदचंद्र पवार साहेबांनी शेतकरयांना फळबाग शेतीकडे कल वळविला शेतकऱ्यांनी देखील त्याचेवर विश्वास टाकून साथ दिली आणि आज या शेतकऱ्यांचे भाग्य उजळले म्हणून त्यांना एक दूरदृष्टीकोणी नेता अशी ओळख आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शरदचंद्र पवार यांना आपले भाग्य विधाता म्हणून मानतात. 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter