News Today (दिलीप भोयर)
वणी :- येथील जिल्हापरिषद बांधकाम अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या १० लाखाच्या सिमेंट रस्ता बांधकामात मोठा गैरप्रकार होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी देताच आमदार संजय देरकर हे घटनास्थळी पोहचून नायक स्टाईल कामाची पाहणी करून सदर कामाची रीतसर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश संबंधित अभियंत्याला देण्यात आले आहे. आमदाराच्या बेधडक कारवाईने ने गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. ही कारवाई चारगाव येथे ता. १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता केली आहे.
वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चारगाव (चौकी) येथे तत्कालीन माजी आमदार बोदकुरवार यांनी विशेष प्रयत्न करून साधुजी भांदकर ते सुरेश नावडे ते बंडू डंभारे यांच्या. घरा पर्यंत सुमारे १२० मीटर लांब व ३ मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रिट रस्ता नुकताच बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्याचा निधी कोणत्या खात्यातून आला याची कोणतीही माहिती नाही. केवळ विशेष प्रयत्नातून मिळाल्याचे या कामाच्या लावण्यात आलेल्या बोर्डावर नमूद आहे.
संबंधित काम कोणत्या खात्यातून मिळालेल्या निधीची आहे. व सदरचे काम किती दिवसात पूर्ण करायचे आहे. आणि त्या कामाची देखभाल किती महिने करायची आहे. याची कोणतीही माहिती नसून तो बोर्ड केवळ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची प्रसिद्धी करीत असल्याचे निदर्शनात येत आहे.
संबंधित काम १० लक्ष रुपयाचे असून या कामात रस्ताला बेड काँक्रिट करणे व त्यावर ४ इंच जाळीचे मजबूत सिमेंट काँक्रिट करणे आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराने बेड काँक्रिट न करताच सरळ सरळ २ इंच सिमेंट काँक्रिट करून रस्ताचे काम पूर्णत्वास आणले आहे. याबाबतची तक्रार गावातील काही नागरिकांनी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्याकडे करताच या तक्रारीची दखल घेण्यात आली व आमदार यांनी संबधित विभागाच्या अभियंत्यांना चारगाव येथे उपस्थित राहून कामाच्या पाहणी करिता बोलवले व काम बघून त्यांना चांगलेच धारेवर धरले आणि या कामाची रीतसर चौकशी करून सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पंचायत समिती विभागा मार्फत चालू असलेले सर्व कामे असेच नित्कृष्ट दर्जाची असल्याची ओरड गावकरी करीत होते. व घरकुलाचे चेक काढून देण्यासाठी ग्राम पंचायतीचे एक नावडे नामक सदस्य ५ ते २ हजार रुपये घेवून चेक आणून देत असल्याचे आरोप केले आहे. सर्व गावकरी भ्रष्टाचाराच्या विरोधात रोष व्यक्त करून भाजप व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात चीड निर्माण करीत होते. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपला जोरदार दणका बसण्याची शक्यता आहे.
भाजपने केले विकासाचे फक्त देखावे गावकऱ्यांचा आरोप
भाजपचे माजी आमदार बोदकुरवार यांनी विकास कामाच्या नावाखाली शासनाचा करोडो रुपयाचा निधी खेचून आणला ऊत मात्र नीलाभर देखील शंका नाही. परंतु या निधीतून केलेला विकास मात्र पुर्णतः भकास होता याची प्रचिती चारगाव येथील केलेल्या सिमेंट रस्ता बांधकामावरून सर्व गावकऱ्यांना दिसून येत आहे. येवढेच नाही तर याच रस्त्याला लागून सा. बां. विभागाकडून देखील १० लाखाचा निधी देवून अश्याच प्रकारचे नित्कृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने केवळ विकासाच्या नावाने देखावे केल्याचे आरोप गावकरी बोलून दाखवत होते. यावेळी आमदार संजय देरकर यांच्या कारवाईने नायक पीचर्स मधील ज्या प्रमाणे अनिल कपूर हे अभिनेते काम करायचे तीच अनुभूत आमदार संजय देरकरांमध्ये गावकऱ्यांना दिसून येत होती.