News Today (दिलीप भोयर)
वणी :- तालुक्यातील शिंदोला परिसरात मागील काही दिवसापासून पट्टेदार चार वाघांचे वास्तव निर्माण झाल्याने शेतकरी व गावकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून वन विभाग या वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी मानवी जीवित हानीची प्रतीक्षा करीत असल्याचा गंभीर आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. आज चिखली येथील शेत शिवारात एका युवकावर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता युवक किरकोळ जखमी झाला आहे.
शिंदोला शिरावामध्ये अनेक वेकोलीच्या खुल्या कोळशाच्या खदानी व सिमेंट दगडाच्या खदानी असल्याने मातीचे मोठ मोठी आधुनिक डोंगरे उभी झाली असून या मातीवर झाडे झुडपे वाढली आहे. त्याच बरोबर काही प्रमाणात वन विभागाचे जंगल देखील आहे. या जंगलात कधीं न दिसणारे पट्टेदार वाघ दिसून येत आहे.
शिंदोला भागात कुर्ली, कळमना, येनाडी, येनक, चनाखा, पार्डी, टाकली, चिखली, कोलगाव, साखरा असे अन्य गावे आहेत. या भागातील जंगली परिसरात शेळी राखे, गुराखी गावातील जनावरे चारत असतात, त्याच बरोबर या भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी देखील जंगली भागाला लागून आहे. तसेच अनेक गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी सायकलच्या सहाय्याने जंगली भागातील रस्त्याने शाळेत प्रवास करीत असतात.
या भागात मागील अनेक दिवसांपासून वाघांचे दर्शन दररोज होत असून शेतकर्यांचा जनावरांवर देखील हल्ले वाढले आहे. शेतात अनेक जन शेती कामासाठी असल्याने वाघ दिसताच अरदा ओरड चालू केली की वाघ पळ काढत असतात. परंतु हा प्रकार आणखी किती दिवस चालवायचा असा निर्वाणीचा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्याच बरोबर कोणतीही मानवी जीवित हाणी होण्यागोदर या वाघांचा बंदोबस्त लावला अशी रास्त मागणी या भागातील शेतकरी करीत आहे.
या भागातील जंगल हे वाघांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त नसून देखील वन विभाग या वाघांना आश्रय देऊन शेतकऱ्यांच्या शेतीवर संकट निर्माण करीत आहे. वाघांच्या भीतीपोटी शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती उद्योग संकटात आल्याने त्यांचे उधर निवाहाचे साधन बंद पडण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे शेती व शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात जात आहे.
पट्टेदार वाघ म्हणजे वाघांच्या प्रजातीतील अत्यंत क्रोधित व मानवी जीवितास हाणी पोहचविणारे प्रजाती आहे. असे चार वाघ या परिसरात वास्तव्य निर्माण करीत असल्याची माहिती वनविभागाला असून देखील वनविभागाकडून असे सांगण्यात येत आहे की, जो पर्यंत वाघांकडून मानवी हाणी होणार नाही तोपर्यंत त्यांचेवर कोणताच बंदोबस्त केल्या जाणार नाही असे बेजबाबदार उत्तरे संगल्या जात असल्याचे आरोप शेतकरी करीत आहे.
या भागातील शेतकऱ्याच्या उधार निरवाहाचे साधन केवळ शेती असून शेतकऱ्यांनी आता आपला व आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जीव गमावावा काय ? मानवी जीवित हाणी झाल्यानंतर वन विभाग जागा होऊन उपयोग काय ? जीवित हाणी होण्याअगोदरच या वाघांचा बंदोबस्त लावण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याच्चे संकेत शेतकर्यांनी दिले आहे.