धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समितीचे आयोजन, शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद
News Today (दिलीप भोयर)
वणी :- येथील विधान सभेचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचा काल तारीख २७ रोजी दुपारी २ वाजता चंद्रपूर येथील चांदा ग्राऊंडवर आयोजित भव्य कृषी महोत्सव व उपवर – वधू परिचय मेळाव्यात धणोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती पुरस्कृत धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर चंद्रपूरचे अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम सातपुते व कृषी महोत्सव प्रमुख श्रीधर मालेकर यांच्या हस्ते मानचिन्ह, शाल, श्रीफळ भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी खा. प्रतिभाताई धानोरकर आ. देवराव भोंगळे माजी जि. प. सदस्य नरेंद्र जीवतोड आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर येथे तीन दिवसीय भव्य कृषी महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन तारीख २७ ते २९ पर्यंत करण्यात आले आहे. यात शेतकरी मेळावा, उपवर – वधु परिचय मेळावा, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन, सरपंच परिषद, उधोजकता मार्गदर्शन, ज्येष्ठांचा सत्कार, सांस्कृतिक मार्गदर्शन व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीतील नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार करण्यात आला. यात ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, वणीचे आमदार संजय देरकर, राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांचा समावेश होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धणोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम सातपुते, उद्घाटक म्हणून खा. प्रतिभाताई धानोरकर, स्वागताध्यक्ष म्हणून मेळावा प्रमुख तथा चंद्रपूर जि. प. चे माजी सी.ओ. श्रीधर मालेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.