News Today (प्रतिनिधी)
वणी :- तालुक्यातील कवडशी येथे दत्त जयंती निमित्त पूनवट येथील शिवराय मित्र मंडळाच्या वतीने तारीख १४ रोजी दुपारी १२ ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या भव्य शिबिराला वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी भेट देवून आयोजकांचे कैतुक केले.
दरवर्षी कवडशी येथील मल्हारगड येथे दत्त जयंती भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येत असतात. या निमित्याने शिवराय मित्र मंडळ पुनवट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केलेले होते. यावेळी या उपक्रमाला सामाजिक कार्यास भरपूर प्रतिसाद मिळाला यात शेकडो रक्तदात्याने आपले रक्तदान केले आहे.
यावेळी रक्त संकलन केंद्र चंद्रपूर येथील डॉ. निधी पुतिया, डॉ. गणेश तुघेकर, गोखरे, अमुल रामटेके, प्रतीक मोटे, महेश दुर्गे, अक्षय, अभिषाश यादिंनी रक्त संकलाचे कार्य पार पाडले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवराय मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश महल्ले, उपाध्यक्ष शुभम पाटील , सचिव सचिन डाहुले , सहसचिव सुमित बोन्डे, कोषाध्यक्ष अमोल कडू ,सदस्य आशिष चिकटे , नरेंद्र बोन्डे , संकेत विचू, गुरुदेव ढेंगळे , गणेश लिंगे, प्रज्वल उकिनकर, विष्णू कामरे, मनोज राखुंडे अक्षय गाताडे शुभम बोन्डे अजय गाताडे कारण ताजने अनिकेत विचू , अनिकेत कडू, कुणाल पायघन , आदींनी परिषम घेतले.
सौ. किरण देरकर यांची रक्तदान शिबिराला भेट
मल्हारगड येथील आयोजित रक्तदान शिबिराला वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या अर्धांगिनी सौ. किरण देरकर यांनी या शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला यावेळी श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर, डॉ विलास बोबडे, रामदास पाटील पाखले, चंपत पाचभाई, मंगेश गोरे, गिरीश सातपुते यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.