Sunday, January 19, 2025
Google search engine
HomeवणीGround report : जनभावनेचा अनादर लोकशाहीला बाधक,मारकडवाडीतील जनक्षोभाची ठिणगी राज्यभर 

Ground report : जनभावनेचा अनादर लोकशाहीला बाधक,मारकडवाडीतील जनक्षोभाची ठिणगी राज्यभर 

सरकारने रचला दडपशहीचा पाया , EVM हटविण्याच्या दिशेने मतदारांचा मूड

NEWS TODAY | दिलीप भोयर 

Political News | नुकतीच राज्याची विधानसभा निवडणूक संपली. अनाकलनीय, अनपेक्षित व आश्चर्यकारक निकालाने राज्यभरातील मतदार सैरभैर झाले आणि ते एकमेकांकडे संशयाने बघायला लागले. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावाने हुकूमशाही विरोधात आवाज उठवून EVM विरुद्ध रणशिंग फुंकले. सत्यता जगाला कळेल असं समजताच सरकारने दडपशहीचा पाया रचला आणि गावातच घेण्यात येत असलेल्या मतपत्रिकेवरील मतदानाला विरोध दर्शवला यामुळे मारकडवाडीतील जनक्षोभाची ठिणगी राज्यभर पसरली. 

मारकडवाडी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील छोटेसे गाव जेमतेम पंधराशे ते दोन हजार मतदान असेल. आपल्या उमेदवाराला गावात भक्कम मतदान होईल अशी त्यांची रास्त अपेक्षा आणि घडलं विपरीत. या गावत उत्तमराव जानकर व विजयसिंह मोहिते पाटील यांचे दोन मोठे गट आहे. तिसरा गट म्हणजे भाजपाचा आहे. नेहमी लढत जानकरव मोहिते गटात व्हायची. येथे तिसरा गट भाजपचा जनाधार अल्प. मात्र यावेळी जानकर व मोहिते गट एकत्र असल्याने भाजपची कोंडी झाली व मताधिक्य घटेल असं वाटत असतानाच चित्र वेगळेच दिसल्याने ग्रामस्थ कमालीचे बिथरले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमुळे आ. उत्तमराव जाणकार व विजयसिंह मोहिते पाटील यांचे दोन्ही गट एकत्रपणे सोबत होते आणि भाजप विरुद्ध पार्टी होती. निवडणुकीचे बिगुल वाजताच महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर तर महायुतीकडून राम सातपुते हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आले आणि निवडणूक संपन्न झाली. या गावात भाजप उमेदवाराला अल्प मते मिळतील असे असताना त्यांना घसघशीत मते मिळाली आणि evm च्या कार्यपद्धती ची ठिणगी पडली. मतदारात कमालीचा जनक्षोभ उसळला.

मतमोजणीत माळशिरस विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर हे निवडून आले. तसा तर सर्वांना आनंद व्हायला पाहिजे. परंतु तो आनंद मारकडवाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत नव्हता. सर्व जण चिंतेत पडले की गावातून महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जाणकार यांना मतदान कमी कसे पडले. गावातील 80 टक्के लोक सातपुते यांच्या विरोधात मतदान करणारे होते. हीच बाब ग्रामस्थांना खटकली आणि मत पत्रिकेवर मतदान करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून संपूर्ण गावकऱ्यांचा होता.

उत्तमराव जानकारांना कमी मतदान हे कोणालाही मान्य नव्हते. त्यामुळे गावातील सर्व तरुणांनी एकता निर्माण केली व मतदान प्रक्रिया पार पाडणारी EVM मशीनवर शंका घेतली. या शंकेचे निराकरण झाले पाहिजे. त्यासाठी गावातच गावकऱ्यांकडून कागदी मतपत्रिकेवर निवडणूक घेवून आपल्या शंकेचे निराकरण करायचे अस गावकऱ्यांचे ठरल त्यांनी नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर व विजयसिंह मोहिते पाटील, आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी सल्ला मसलत केली. आणि गावकऱ्यांनी कागदी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी तसा सर्वानुमते ठरावही घेतला आणि मतदानाची तारीख ठरली.

एखाद्या गोष्टीवर जर शंका येत असेल तर त्याचे निराकरण करणे हे अनिवार्य असते. मतदान तर लोकशाहीची ताकत आहे. इथे माणसांचा माणसांवर विश्वास नाही. तर मग माणसाने बनवलेल्या EVM मशीन माणसाने का म्हणून विश्वास ठेवायचा असा प्रश्न प्रत्येक मतदारांमध्ये पडला होता. म्हणून येथील गावकऱ्यांनी कागदी मतपत्रिकेवर आपले मतदान करून EVM मशीनची सत्यता पडताळ्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न उभारला केला आणि यातून निवडणूक आयोगाच्या EVM वरील शंका कुशंका देखील दूर झाली असती.

एक तर हा गावकऱ्यांनी सर्वानुमते अशासकीय प्रयत्न उभरण्याला होता. तो केवळ एका गवापुरता मर्यादित होता आणि यातून कोणताही आक्षेप कुणावर नव्हता. यात खर तर सरकारने आपके तोंड खुसायला पाहिजे नव्हते. कारण “गाव करी ते राव न करी” गावकऱ्यांचा निर्णय गावकऱ्यांना पूर्णत्वास नेण्यासाठी कोणाचीही हरकत नव्हती. आणि गावकऱ्यांना अडविण्याचा अधिकार सरकारला नाही. आपल्या गावात काय करायचे आणि काय करायचे नाही, हा अधिकार गावकऱ्यांना आहे.

गावकऱ्यांनी बहुमतांनी EVM मशीनची सत्यता आणि गावातील मतदान खरंच योग्य झाल आहे का? हे तपासण्यासाठी तारीख ३ डिसेंबर २०२४ रोजी कागदी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायची ठरवलं असता सरकारने तत्काळ पोलिस छावणी उभी केली. त्यामुळे गावकरी आणखी संतापले व शेवटी गोळी सुद्धा छातीवर झेलू पण मतदान करूच या भूमिकेवर ठाम झाले. त्यामुळे सरकारने आणखी त्यागावर सैन्याची तुकडी पाठवून गावाला छावणीचे स्वरूप दिले व काही महत्वाच्या पुढाऱ्यांना नजर कैद केले आणि गावात भीतीचे वातावरण निर्माण केले. 

निवडणूक आयोगाची EVM मशीन पारदर्शक आहे असे त्यांचे ठाम मत आहे तर मग गावकऱ्यांना गावकऱ्यांच्या खर्चाने उभारलेला कागदी मतपत्रिकेचा प्रयोग का उधळून लावावा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. हा प्रयोग उधळून लावल्याने ही EVM मशीन आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आणि या आंदोलनाची ठिणगी आता राज्यभर पेटली आहे. 

राज्यात महायुतीचे कोणतेही वातावरण नसताना त्यांच्या अनपेक्षित २३२, जागा निवडणुकीत विजयी होणे हे एक राज्यातील प्रत्येक मतदारांना अविश्वसनीय बाब आहे. त्यामुळे जे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध लढले आणि देशाला स्वतंत्र मिळवून दिले. या स्वातंत्र्यातून मिळालेली लोकशाही ही अबाधित ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य झाले आहे. 

अमेरिका, जपान सारखे तंत्रज्ञानात प्रगत असलेले देश आजही कागदी मतपत्रिकेवर निवडणूक लढवीत आहे. आणि आपल्या देशात अजून कोणतेच असे थोड तंत्रज्ञान अवगत नाही. देशाची ७०% जनतेला वापरत असलेला मोबाईल व्यवस्थित कळत नाही. संगणकाचे पाहिजे तसे ज्ञान नाही. मग EVM मध्ये काय आहे. आणि काय नाही हे जिल्ह्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देखील व्यवस्थित माहिती नाही. मग ही EVM मतदारांच्या मानगुटीवर मनमानी पद्धतीने का म्हणून बसविल्या जात आहे. असा निर्वाणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकशाहीत लोक या देशाची मालक आहे. प्रशासनातील अधिकारी हे जनतेचे नौकर व सरकार मधील मंत्री हे जनतेचे मुनिम आहे. मालक नाही. मग हे नोकर आणि मुनिम यांना जनतेने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जाण्याचा अधिकार कोणी दिला आहे. लोकशाहीची हुकुमशाही या EVM ने तर निर्माण केली नाही ना? लोकशाही वाचवायची असेल तर देशातील प्रत्येक तरुणांना आता EVM च्या विरुद्ध आवाज मजबूत करण्याची वेळ आली आहे. आता कोणताही क्रांतिकारी देश वाचवायला येणार नाही तर त्या क्रांतीकाऱ्यांचे स्मरण करून क्रांती घडविण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी मारकडवाडी या गावातील तरुणांनी व गावकऱ्यांनी या क्रांतीची ठिणगी पेटवली आहे असे दिसून येत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter