कृ.ऊ.बा.स. पदाधिकारी व भाजप पुढाऱ्यांची श्रेय वादासाठी शेतकऱ्यांना धरले वेटीस
News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआय कडून शासकीय कापसाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. व चुकरा जमा होण्यासाठी त्याची ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. परंतु ज्या पध्दतीने ऑनलाईन करून पुढील दोन महिन्यांची तारीख देण्यात येत होती.
त्यावर आमदार संजय देरकर यांचे कडून आक्षेप घेण्यात आला व सरळ जीनिंग मध्ये ऑनलाईन करून कापूस खरेदी बाबत सुचविले तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआयला या – ना त्या कारणाने कापूस खरेदीसाठी भाजपचे पुढारी व समितीचे पदाधिकारी आडेवेळे घालत असल्याने केवळ श्रेयवादासाठी शेतकरी विनाकारण वेटिस पकडल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होत आहे.
कोरपना तालुक्यात दररोज ७ ते ८ हजार क्विंटल कापूस खरेदी चालू असून वणीत मात्र नाममात्र कापूस खरेदी केल्या जात असल्याने आ. संजय देरकर यांनी ता. २६ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, सीसीआय केंद्र प्रमुख आणि शेतकऱ्यांना घेवून कोरपना पॅटर्नने कापसाची खरेदी करण्यासाठी आदेशीत केले होते.
परंतु या पद्धतीने कापूस खरेदी केल्यास याचे सर्व श्रेय आमदार संजय देरकराना जाईल त्यामुळे सातत्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी , अधिकारी व सत्तेतील भुरके पुढारी शेतकऱ्यांना मानसिक त्रास देण्यात आपली धन्यता मानत आहे.
सोमवार तारीख २ डिसेंबर पासून वणी परिसरातील ६ जिणींग मध्ये सीसीआय आपली कापूस खरेदी सुरू करणार होते. परंतु मध्येच कुठ तरी घोड शिंकल आणि कापूस खरेदीत खोळंबा निर्माण झाला. आणि शेतकऱ्यांना कुठ तरी मानसिक, आर्थिक, शारीरिक प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासाचा प्रतिरोध घेण्यासाठी शेतकरी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपला हात दाखवन्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा आहे.
शेतकऱ्यांना कुठेही मानसिक त्रास होऊ नये या उद्देशाने आमदार संजय देरकर यांनी प्रामाणिक प्रयत्न करून सर्व उपयोगी तोडगा काढून शेतकऱ्यांना कापूस सुरळीत विकता येईल आणि प्रशासनालाही सोयीस्कर होईल. परंतु साधा आणीं सोप्या पद्धतीने कमी त्रासात शेतकऱ्यांनी कापूस विकला तर सर्वत्र आ. संजय देरकर यांची स्तुती वाढतील या उद्देशाने बाजार समिती व भाजपच्या काही भुरक्या पुढाऱ्यांनी सिसीआयची कापूस खरेदीमध्ये आडकाठी टाकत असल्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे भाजप व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांप्रती मोठा रोष निर्माण होत आहे.
वणी हा परिसर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी बाजार पेठ असून ही बाजार पेठ अत्यंत संवेदनशिल आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचा कधी ही उद्रेक होऊन मागील. २० वर्षा अगोदरची घडलेली पूर्नरावृती घडण्याची दाट शक्यता आहे. कदाचित बाजार समितीच्या पुढाऱ्यांना व सिसीआयला शेतकर्यांचा उद्रेक अपेक्षित आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथून जवळच असलेल्या कोरपना येथे देखील सीसीआय कडून शासकीय कापूस खरेदी सुरू केली आहे. त्या ठिकाणी एका दिवसात ७ ते ८ हजार क्विंटल कापूस खरेदी होत असेल तर वणीत का केल्या जात नाही. का म्हणून शेतकरयांना वेठीस पकडल्या जात आहे. असा प्रश्न शिवसेने कडून उपस्थित केला असून तत्काळ उपाय योजना करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांचे नेतृत्वात सुधीर थेरे, प्रवीण खानझोडे, राजू इड्डे, मंगेश पाचभाई, रवी पोटे यांनी सहाय्यक संस्था निबंधक यांचेकडे एका निवेदनद्वारे मागणी केली आहे.