जिनिंग मध्येच होणार ऑनलाईन नोंदणी, युद्ध पातळीवर खरेदीच्या हालचालीना वेग
Nees Today
दिलीप भोयर
वणी :- येथील शासकीय कापूस खरेदी येत्या सोमवार पासून तब्बल सहा जीनिंगवर सुरू होणार आहे. व त्याच ठिकाणी शेतकऱ्यांची ऑनलाईन अत्यावाध प्रणालीची पूर्तता करण्यात येणार आहे. यासाठी सीसीआय व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून युद्ध पातळीवर काम चालू असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव झाडे व सीसीआयचे केंद्र प्रमुख हेमंत कुमार ठाकरे यांनी दिली आहे. आमदार संजय देरकर यांच्या दणक्या नंतर यंत्रणा कामी लागली आहे.
काल तारीख २७ रोजी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआयच्या अधिकाऱ्याना सोबत घेवून बैठक घेतली. यात कापूस खरेदीबाबत अत्यावध प्रणालीसाठी लागणारे टोकण बंद करून सरळ कापूस खरेदी करून तिथेच त्यांची अत्यावध नोंदणी करण्यासाठी ठरले होते. असे अधिकाऱ्यांनी देखील मान्य केले.
वणी येथे केवळ ३ जीनिंग मध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. तर केवळ २ संगणकावर कृ.ऊ. बा.स. मध्ये अत्यावध ( ऑनलाईन ) नोंदणी सुरू होती. त्यासाठी अगोदर शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीकरिता टोकण देण्यात येत होते. टोकण घेवूनही शेतकऱ्यांची अत्यावध ( ऑनलाईन ) नोंदणी प्रलंबित पडत होती. शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
हा त्रास कमी करण्यासाठी आमदार संजय देरकर यांनी टोकण पद्धत बंद करण्याचे सुचवले व सीसीआय सोबत करारनामा झालेल्या सर्व जिंनिंगमध्ये कापूस खरेदी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यासाठी आदेशित केले होते. यावरून आज तारीख २८ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांचा ऑनलाईन नोंदणीसाठी अतिरिक्त दोन सेंटर सुरू करण्यात आले आहे. असे चार सेंटरवर नोंदणी सुरू झाली आहे.
सीसीआय कडून वणी येथील एस.बी., महाविरा, साईकृपा, राजा, गुलाब, नगरवाला अश्या ६ जिनिंग धारकांकडून कापूस खरेदीसाठी करारनामा करण्यात आला आहे. परंतु केवळ आळीपाळीने ३ जीनिंगमध्ये खरेदी सुरू होती. ती आता सोमवार पासून ६ ही केंद्रावर खरेदी सुरू करणार आहे. दररोज ४०० ते ५०० वाहने कापूस खरेदी केल्या जाणार आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर सीसीआय व कृ.ऊ.बा.स. कडून व्यवस्था करणे सुरू आहे.
ऑनलाईन नोंदणीसाठी लागणारे टोकण पद्धत आज पासून बंद करण्यात आली आहे. परंतु ऑनलाईन पद्धत करणे अनिवार्य आहे. आज रोजी १२९ वाहने सीसीआयने खरेदी केल्या असून ५ वाहने यार्डात थांबली होती. ती देखील घेण्यात येईल अशी माहिती सीसीआय व कृ.ऊ.बा.स. चे सचिव अ. का. झाडे यांनी दिली आहे.
ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकण देण्यात येत होते. आणि दररोज केवळ ५० वाहने कापूस खरेदी केल्या जात होते. ते टोकण बंद करून सरळ खरेदी सुरू असलेल्या केंद्रावर ऑनलाईन करून कापूस भरलेली वाहने काटा करून पावती देण्यात येणार आहे. कापसाचा चुकारा जमा करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी आधारकार्ड, लिंक असलेले बँक खाते पुस्तक, ७/१२ व २०२४ -२५ चे पेरावे पत्रक असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर ज्यांच्या नावाने ७/१२ आहे ते किंव्हा त्यांच्या रक्त मासातील व्यक्ती उपस्थित असणे अनिवार्य आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्यात येत आहे की, ऑनलाईन पद्धत बंद केली आहे. तसे नसून ऑनलाईन पद्धतीसाठी लागणारे टोकण बंद केले आहे. परंतु विरोधांना आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे केलेले कार्य पचनी पडत नसल्याने चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवून संभ्रम तयार करून शेतकर्यांनी दिश्या भूल करीत आहे. त्यावर कोणीही लक्ष देवू नये असे आवाहन शेतकरयांना करण्यात आले आहे.