आमदार बोदकुरवार यांचा खोटारडेपणा उघड झाल्याने मतदारांत रोष
News Today
प्रतिनिधी
वणी : वणी-वारोरा रेल्वे पूलाच्या बांधकामावरून भाजपा आमदाराने केलेल्या चुकीच्या दाव्याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आमदाराने आपल्या प्रचार सभेत सांगितले की, पुलाचे काम पूर्ण झाले असून तो जनतेसाठी उघडला आहे, परंतु प्रत्यक्षात तो पूल अजूनही बांधकामाच्या टप्प्यात आहे. तरी देखील खोटे बोलून मतदारांची दिशाभूल केल्या जात असल्याचे आरोप होत आहे. आ. बोदकुरवार यांच्या फसव्या विकासावर निवडणुकीची धुरा असून या खोट्या प्रचाराला मतदार मात्र बळी पडणार नाही अश्या बोचक्या प्रतिक्रिया उमटत आहे.
या दाव्याचा एक पोस्ट इंस्टाग्रामवर केल्यानंतर त्याला 20,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टमध्ये आमदाराने पूलाच्या कामाची “पूर्णता” दाखवली होती, पण सत्य परिस्थितीतील फरक लोकांच्या लक्षात येताच सोशल मीडियावर वाद निर्माण झाला.
काही लोकांनी या चुकीच्या माहितीचा निषेध केला आहे, तर दुसरे लोक या पोस्टच्या आधारे राजकीय प्रचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सोशल मीडियावर चर्चा होणे हे दर्शवते की, नागरिक आता सत्यतेची मागणी करत आहेत.
तथ्याची पूर्तता होण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि संबंधित पक्ष यांच्याकडून अधिक माहितीची अपेक्षा केली जात आहे.
जो पुल वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटवर उडान पूल म्हणून बांधकाम पूर्ण झाले असे दाखवित आले आहे. याबाबत सत्यता पडताळणी केली असता तो पुल खातेरा येथील पैनगंगा नदीवरील आहे . त्यामुळे आ. बोदकुरवार यांचा विकास तोंडघशी पडला आहे.
वणी वरोरा रेल्वे गेट