News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील भाजपाचे आमदार बोदकुरवार यांनी काल तारीख १८ रोजी आपले शक्ती प्रदर्शन दाखविण्यासाठी ( पेड पब्लिक) मजुरांचा वापर केल्याचे उघडपने झळकले असून ज्या लाडक्या बहिणींना मजुरीने बोलविले होते, त्यांच्या मजुऱ्या न मिळाल्याने त्यांनी आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास शेकडो महिनांनी त्यांच्या घरासमोर मजुरीसाठी गर्दी केल्याने काल निघालेल्या रॅलीचे पितळ उघड पडले आहे.
आ. बोदकुरवार यांनी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी तेलंगणातील जनतेला बोलवून गर्दी दाखविण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा पासून त्यांची पीछेहाट सुरू झाली होती. त्यानंतर त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी त्यांच्याच एका पदाधिकाऱ्याने कुणबी समाजा बद्दल अभद्र टीपणी केल्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पार्टी वादात अडकली होती.
बघा लिंक उघडून व्हिडिओ
https://www.facebook.com/share/v/1Dy7V36Ps5/
त्यानंतर गावागावांतील प्रचारादरम्यान आ. बोदकुरवार यांची मतदारांनी अडवणूक करून विकासाबाबत प्रश्न विचारून घाम फोडला तर काही गावातून चक्क हाकलून लावण्यात आले होते. त्यामुळे बोदकुरवार यांच्या प्रचारसभेकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वणी येथे येण्यासाठी चक्क नकार दिला, त्यामुळे त्यांचेवर हैद्राबाद येथील ३ लाख ४० हजाराने पराभुत झालेल्या माधवी लता यांना बोलवून सभा संपन्न करावी लागली.
मागील १० वर्षापासून विधानसभा सदस्य असलेले बोदकुरवार हे स्वतःला विकास पुरुष म्हणून संबोधित होते. तरी देखील राज्यातील कोणत्याही नेत्यांनी बोदकुरवार यांना प्रचार सभा न देणे म्हणजे हा एका संशोधनाचाच भाग झाला होता. मग या विकास पुरुषाला त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी भकास का करावे अशी जोरदार चर्चा रंगत आहे.
लाजे खातर कोणी तरी बाहेरून प्रचार सभेला बोलवावे लागेल अश्या कार्यकर्त्यांच्या हट्टाला धरून शेवटी हैद्राबाद येथील माधवी लता या स्वतः विधानसभा निवडणुकीत ३ लाख ३८ हजाराच्या मताने पराभूत झाल्या होत्या. त्यांना बोदकुरवार यांनी आपल्या विजयासाठी सभेला आणल्याने हैद्राबाद येथील फुसका बार वणीत आवाज करणार का ? अश्या चर्चा रंगायला लागल्या होत्या.
तारीख १८ रोजी बोदकुरवार आपली प्रचार सभा आयोजित केली या सभेला जोरदार शक्ती प्रदर्शन दाखवायला जनतेची गरज असते. त्यासाठी मतदार संघातून कोणताही मतदार सभेला येणार नसल्याचे चित्र दिसत असल्याने भाजपने शक्कल लढवीत वणी शहरातील गोर गरीब महिलांना ५०० रुपये रोजी प्रमाणे हजारो महिलांना बोलाविण्यात आले.
या महिलांना गोळा करण्यासाठी एजंटचा वापर करण्यात आला व एजंट कडूनच त्यांना त्यांची रोजी ठरवून मजूरी देण्याचे ठरले परंतु त्या एजंटने महिलांना मजूरी न देताच त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी चक्क बोदकुरवार यांचे घर गाठले. त्यामुळे कालच्या रॅलीतील जनसमुदाय जा मजुरीचे गोळा केल्याचे बिंग फुटले. घरी महिलांची गर्दी गोळा होताच बोदकुरवार यांनी आपला पाय काढता करून बाहेर निघून गेल्याची माहिती आहे….
एकूणच प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी झालेल्या घटनेने, सुरु झालेला अपशकून, गावागावातून आमदारांना हाकलून लावने, फलक फाडणे या घटना हया पराभवाची नांदी असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
बघा लिंक उघडून व्हिडिओ
https://www.facebook.com/share/v/14bTspxArV/