News Today
दिलीप भोयर
वणी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, एक नवीन राजकीय कुटनीती समोर आली आहे. भाजपचे आमदार बोदकुरवार आणि एक स्वतंत्र उमेदवार यांच्या प्रचारासाठी इंस्टाग्राम वरील विशिष्ट काही पेजचा वापर केला जात आहे. या पेजवर दोन्ही उमेदवारांचे पोस्ट आणि फोटो एकत्रितपणे शेअर केले जात आहेत. त्यामुळे आ. बोदकुरवार समर्थीत इन्स्टाग्राम पेजेस जसे 1)wanikar_zone _01, 2) waninews updates, 3) maregao_wale 4)cityhubmedia_01 यांना IT CELL नी रसद पुरवून अपक्षाची “शिट्टी” वाजवायला लावली आहे, अशी चर्चा जनसामान्यात रंगली आहे.
हा घ्या पुरावा बघा लिंक उघडुन
https://www.instagram.com/wanikar_hub_01?igsh=ZDQ0enpibWZuMHY=
विशेष म्हणजे, स्वतंत्र उमेदवार आणि विरोधी पक्षाचा उमेदवार हे दोघेही समान जातीसंबंधी असलेले आहेत. त्यामुळे, भाजप या रणनीतीचा उपयोग करून विरोधी पक्षाच्या उमेदवाराची मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून विभागाणीसाठी कूटनीतीचा पुरेपूर वापर करत असल्याचे इन्स्टा वरील विशिष्ट पेज वरून प्रसिद्ध होत असलेल्या पोस्टमुळे मतदारांना जाणीव होत आहे. त्यामुळे भाजपाच्या फुकणीवर ही “शिट्टी” वाजत असल्याने यांच्या छुप्या युतीचा बुरखा फाटला आहे असे बोलल्या जात आहे.
हा घ्या दुसरा पुरावा लिंक उघडून बघा
https://www.instagram.com/waninewss?igsh=MWl6b2t6MDI2c3J3cg==
राजकीय विश्लेषकांच्या मते, हे एक प्रकारचे गूढ कुटनीतिक चाल आहे, ज्याद्वारे पक्ष ‘अपक्ष’ आपल्या विरोधकांच्या मतांचा धावा करणे व त्या मतांमध्ये कटौती करण्याचा ध्यास घेत आहे. मात्र या प्रकारच्या प्रचारामुळे निवडणुकीतील जातीय समीकरणांवर प्रश्न उपस्थित होत आहे.
बघा फोटो झूम करून
इंस्टाग्रामवर दोन्ही उमेदवारांचा प्रचार एकत्र करून, पक्ष ‘अपक्ष’ ने त्यांचा मुख्य उद्देश्य विरोधकांचा प्रभाव कमी करण्याचा ठेवला आहे. या प्रचाराच्या पद्धतीचे परिणाम निवडणुकीच्या निकालावर काय होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, आणि त्यामुळे सर्व सुज्ञ मतदारांनी आपल्या अमूल्य मतांचा योग्य वापर करणे अनिवार्य झाले आहे.
हा घ्या तिसरा पुरावा लिंक उघडून बघा
https://www.instagram.com/maregaon_wale?igsh=MWZoZTdvYXpwa3dzdQ==
या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद प्रचंड मोठी होवू शकते या दृष्टीने अगोदरच भाजपच्या IT CELL ने संयुक्त प्रचार करण्याचा कुटनितीक खेळ रचला असावा यासाठीच “शिट्टीचा” जन्म झाला काय ? अशी चर्चा रंगली आहे.