News Today
प्रतिनिधी
प्रतिनिधी
वणी :- येथील काँग्रेसचे पदाधिकारी संजय खाडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवीत असताना अपक्ष उमेदवारी लढवून पक्ष शिस्तीचा भंग केला म्हणून त्यांना पुढील सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात आले आहे. अखेर उशिरा का होईना पण संजय खाडे यांच्या निलंबनाची शिट्टी वाजवून काँगेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना (ऊबाठा) व इतर घटक पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवीत आहे. त्यामुळे जागा वाटपानुसार यवतमाळ जिह्यातील ७ जागे पैकी सर्वाधिक ५ जागा काँग्रेस तर एक एक जागेवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस लढवीत आहे.
यातील वणी विधानसभेची जागा ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला गेली व त्यांनी संजय देरकर यांच्या हातात मशाल दिली. शिवसेना गटाला जागा गेल्याने नाराज झालेले काँग्रेसचे खाडे यांनी पक्ष शिस्त भंग करून अपक्ष उमेदवारी लढविण्याचा निर्णय घेतला व ते निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे काँगेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे आदेशावरून निलंबित करण्यात आल्याचे पत्र खाडे यांना दिले आहे. खाडे यांच्या निलंबनामुळे महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. जे काँग्रेस पदाधिकारी खाडे यांचेसोबत आहे ते महाविकास आघाडीत परतणार असल्याची माहिती आहे.