News Today
प्रतिनिधी
वणी :- भारतीय जनता पार्टीचे स्वयंघोषित विकास पुरुष आमदार बोदकुरवार यांची प्रचारादरम्यान गावागावात नाचक्की होत असून भाजपावरील रोष दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यांचेकडून लावण्यात येत असलेले प्रचार फलक देखील फाडण्यात येत आहे. त्यामुळे या विकास पुरुषाला मतदार मात्र भकास पुरुष म्हणून घोषित करीत असल्याची वार्ता वणी विधानसभेत पसरली आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान त्यांची चांगलीच नाचक्की होताना दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक प्रकारचे प्रचार कार्य सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक संपन्न होत आहे. यात मागील दहा वर्षापासून वणी विधानसभेत भाजपचे आ. बोदकुरवार हे राज्य करीत आहे. मागील दहा वर्षात ग्रामीण भागातील समस्यांना कधीच महत्व न देता केवळ शहरी भागात काँक्रिट रस्ते देवून त्यात मोठा भ्रष्ट्राचार केला आल्याचा आरोप मतदार करीत आहे.
त्यामुळे ग्रामीण भागात आ. बोदकुरवार यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदाराची लाट उसळत आहे. परिणामी ते ज्या गावात प्रचारासाठी जात असते त्या गावातून त्यांना हाकलून लावल्या जात आहे. तसेच त्यांनी लावलेले प्रचार फलक देखील फाडण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांचा भाजपा व त्यांच्या आमदराप्रती किती आक्रोश आहे हे दिसून येत आहे.
मतदार संघाचा फुसका विकास करून स्वताला विकास पुरुष म्हणून संबोधनारे बोदकुरवार यांची प्रचार दौऱ्या दरम्यान त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. कुठे कुणबी समाजाबद्दल अभद्र टिपनीवरून त्यांना टोकल्या जात आहे. तर कुठे रस्ते नाही, वीज, नाही स्वच्छ पाण्याचे आरो बंद पडले आहे. अश्या अनेक प्रश्नांना घेवून त्यांची मतदार संघातील गावागावात चांगलीच गोच्ची करून टाकत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जोर का झटका धीरे से लगणे वाला है. यात महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेचे उमेदवार संजय देरकर यांची मशाल चांगलीच मतदारांच्या मनात क्रांती घडवितांना दिसून आहे.