गावागावात वाढला भाजप आमदाराच्या विरोधात रोष
News Today
वणी :- येथील आ. बोदकुरवार यांच्या निवडणूक प्रचारासाठी लावलेले प्रचाराचे फलक एका तरुणांनी फाडल्याची घटना दोन दिवसागोदर घडली आहे. यात एका तरुणावर शिरपूर पोलीसात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही घटना तालुक्यातील कुरई या गावातील आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्याला प्रचंड मोठा वेग आला आहे. यातच गावागावात मतदारांना ओळख पटण्यासारखी आपापल्या पक्षाचा व निवडणूक चिन्हांचे फलक लावण्यात आले आहे. तसेच फलक कुरई येथे लावण्यात आहे असता ते फलक एका आदिवासी समाजाच्या तरुणाने भाजप आमदार बोदकुरवार यांच्या प्रती असेलेला रोष व्यक्त करून फलक फाडले आहे. संपूर्ण गावात भाजपच्या फसव्या विकासाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आ. बोदकुरवार यांचे निवडणुकीचे भविष्य अंधारमय दिसून येत आहे.