उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर मतदारांकडूनही भजपाला बसायला लागले शाब्दिक फटके
News Today
दिलीप भोयर
वणी :- भाजपाचे आ. बोदकुरवार यांना आज तारीख १२ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास मरेगावं तालुक्यातील सराटी या गावातून मतदारांनी कोणताही प्रचार न करू देता वाहनाच्या ताफ्यासह गावकऱ्यांनी त्यांना हाकलून लावल्याने उध्दव ठाकरे यांच्या सभे नंतर मतदारांमध्ये भाजपप्रती मोठा रोष पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आ. बोदकुरवारांची चांगलीच नाकी नऊ येत आहे.
येत्या २० नोव्हेंबर रोजी संपन्न होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका जसजश्या जवळ येत आहे तस तश्या भाजपच्या प्रचारात विघ्न तयार होताना दिसून येत आहे. आज आ. बोदकुवार यांचा मारेगाव तालुक्यात प्रचार दौरा असताना मांगरूळ या गावात गावातील मतदार बांधव व कुणबी समाज बांधवांनी त्यांना घेराव घालून प्रश्नाचा भळीमार केला यावेळी बोदकुरवार यांची बोबडी उडाली होती. तसेच आज रात्री सराटी येथील ग्रामस्थांनी तर त्यांना वाहनातून उतरूच न देता गावातून हाकलून लावले आहे.
भारतीय जनता पार्टीचे मनसुबे व त्यांच्या उमेदवारांचा खोटा विकास समोर येत असून गावागावात भाजपाप्रती मोठा रोष दिसून येत आहे. अहम पनाच्या गुर्मीत वावरणाऱ्या आमदाराला जनतेनी तोंडघशी पाडल्याने मतदार संघात चांगलीच चर्चा रंगत आहे. काल तारीख ११ रोजी शिवसेना पक्षप्रमुख वणीत दाखल होताच त्यांची बॅग तपासण्यात असण्यात आली या बाबीचा मतदारांमध्ये मोठा रोष तयार झाला. आज पर्यंतच्या इतिहासात कोणत्याही भाजपच्या राजकीय पुढाऱ्यांची अशी तपासणी करण्यात आली नाही. परंतु ठाकरे यांचीच का असा प्रश्न उपस्थित झाल्याने मतदान क्रोधित झाला आहे.
त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनोगतात भाजपच्या शेतकरी विरोधी नीतीची चांगलीच चिरफाड करण्यात आली होती. त्यामुळे उपस्थित शेतकरी व मतदारांमध्ये जागृती तयार झाल्याने भाजपाला प्रचार करणे देखील अवघड झाले आहे. गावागावात मतदार भाजपच्या विरोधात उतरून चक्क आ. बोदकुरवार यांचेवर चालून जात आहे. त्यामुळे यावेळी भाजपचा वणी विधानसभा क्षेत्रातून पूर्ण सुफडा साफ होण्याची चिन्ह दिसून येत आहे.