Thursday, December 12, 2024
Google search engine
Homeवणीभाजपाच्या आमदाराला व कार्यकर्त्यांना गावबंदी वणी विधानसभेत झडकले फलक, ते वक्तव्य सत्यच...

भाजपाच्या आमदाराला व कार्यकर्त्यांना गावबंदी वणी विधानसभेत झडकले फलक, ते वक्तव्य सत्यच ” आय विटनेस”  सापडले.

कुणबी समाजाबद्दल अभद्र वक्तव्य करणे भाजपला पडले महागात

संपूर्ण विदर्भात निषेधाचे सत्र सुरू, ऐन निवडणुकीत भाजपची दमछाक 

News Today 

दिलीप भोयर

वणी :- येथील भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या परिसरात भाजपच्या व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी याने कुणबी समाजाबद्दल अत्यंत घृनास्पद वक्तव्य केल्याने त्याचेवर वणी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचे संपूर्ण विदर्भात भाजपाचा विरोधात पडसाद उमटले असून सर्वत्र सकल कुणबी बांधव रस्त्यावर उतरून त्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आहे. वणी तालुक्यातील झोला या गावच्या समोर कुणबी समाजाप्रती अभद्र भाष्य केल्याने भाजप आमदार व भाजपचे कार्यकर्तासाठी गवबंदी म्हणून फलक झडकल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. 

दिनांक ४ नोव्हेंबर रोजी भाजपाचे उमेदवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालय परिसरात एका समाज कंठकाने कुणबी समाजाबद्दल  अभद्र अपमान जनक व कुणबी समाजाच्या भावना व्यथित होईल अश्या पद्धतीचे वक्तव्य केल्याने त्याला तेथील भाजप कुणबी कार्यकर्त्यांनीच चांगलाच चोप दिला व ही माहिती शहरात वाऱ्या सारखी पसरताच शेकडो सकल कुणबी बांधव एकवटले व त्यांनी निषेध सभा बोलवून त्याच वेळी रात्री तारीख ५ रोजी शेकडोच्या संख्येनी कुणबी समाज बांधवांनी वणीचे पोलिस स्टेशन गाठून सुधीर साळी यांचेवर गुन्हा नोंद केला आहे. 

गुन्हा नोंद होतच तमाम समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या वृतामुळे  राज्यभरातील कुणबी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संपूर्ण राज्यात या अभद्र व्यक्ताव्याच्या विरोधात निषेध नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदावारांना या घटनेने प्रचंड अडचणीत आणले आहे. वणी तालुक्यातील झोला या गावात सकल कुणबी समाजाच्या वतीने गावाबाहेर भाजपच्या आमदाराला व त्यांच्या कार्यकर्त्याना गावबंदी म्हणून फलक झडकले आहे.  हा फलकाची संपूर्ण विधान सभा क्षेत्रात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. 

लोकसभेतील चंद्रपूर येथील भर सभेत सक्या बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारे नेते आणि कुणबी समजाबद्दल अभद्र वक्तव्य करणारे कंठक आपल्या जिभे वरील “सु” रांचा “धीर” अनावरण केल्याने भाजपला प्रचंड मोठा फटका बसला आहे. भर सभेत बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासूनही एक सुधीर मी तस बोललो नाही म्हणून स्पष्टीकरणं देत होता. खोटे बोला पण रेटून बोला असे दुटप्पी धोरण राबविले होता. तेच धोरण वणीतील कुणबी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावर येथील भाजपाचे पदाधिकारी राबवून आरोपींची पाठ राखण करीत आहे. त्यामुळे आणखी रोष वाढत आहे.

तसेच वरिष्ठांच्या दबावाखाली भाजपतील कुणबी व ओबीसी नेते देखील चक्क खोटे बोलून समाजाची दिशा भुल करीत आहे.  सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते दबल्या जाणार नाही. भाजपाचे खोटे बोलणे व “मी नाही त्यातली कडी लाव आतली” ह्या मनी प्रमाणे आहे.  नेहमीचीच भाजप आपली भूमिका बदलवत असते त्यामुळे भाजपा वरील जनतेचा विश्वास पुर्णतः उडाला आहे. 

त्या अभद्र वक्तव्याचा प्रकार घडला एका वकीलासमोर 

(वकील म्हणाले आय एम दी आय विटनेस)

तारीख ४ रोजी भाजप उमेदवाराचे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन असल्याने अनेक जण तिथे उपस्थित होते. त्याच ठिकाणी एक कुणबी समाजाचेच विधितज्ञ (वकील) देखील आवर्जून उपस्थित होते. सुधीर साळी हे पांढर शुभ्र शर्ट घालून तिथे आला व त्या ठिकाणी चालू असलेल्या चर्चेत सहभागी झाला व त्याने कुणबी समाजाबद्दल अभद्र टीपणी केली असता उपस्थित त्याच ठिकाणी वाद झाला व सुधीर यांना काही लोकांनी आत नेले व तिथं त्याला मारहाण झाली त्या ठिकाणी उपस्थित हंसराज अहिर यांनी ते भांडण सोडविण्याचा प्रयत्न. केला आणि तारेंद्र बोर्डे यांनी देखील आमदार यांना कुणबी समजा बद्दल असे वक्तव्य करीत असताना आपण बग्याची भूमिका घेता का असा प्रश्न देखील उपस्थित केला हा सर्व प्रकार घडत असताना संबंधित ते वकील त्याच ठिकाणी उपस्थित होते अशी त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे भाजपाने पत्रपरिषद घेवून चुकीची माहिती प्रसारित करून समाजाची दिशा भूक केल्याचे उघड झाले आहे. या घटनेचे ते वकील प्रत्यक्ष दर्शी पुरावा आहे. ते पोलीसात देखील आपली जबानी बयान देणार असल्याचे त्यांनी न्युज टुडे जवळ नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.

वणी न्युज टुडे कधीच खोटी बातमी प्रकाशित करीत नाही तसेच कोणताही तेढ निर्माण करीत नाही व कोणत्याही षडयंत्राला खतपाणी घालत नाही.  जे सत्य असते तेच वाचकांच्या समोर परखडपणे प्रसारित करीत असते त्यामुळे जे आरोप आ. बोदकुरवार व काही नेत्यांनी समाजापेक्षा पक्ष मोठा समजून वणी न्युज टुडे या पोर्टलवर लावले होते ते सर्व आरोप खोटे निघाल्याने भाजप आणखी तोंड घशी पडली आहे. यामुळेभाजपचे खोटारडे रूप जनमानसासमोर उघड पडले आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter