बाबापुर – कायर येथील घटना
News Today
दिलीप भोयर
वणी:- तालुक्यातील बाबापूर – कायर शेतशिवरात काल तारीख ५ रोजी दुपारच्या दरम्यान जंगली जनावरापासून शेतीतील शेतमाल सुरक्षेसाठी लावलेल्या विजेच्या धक्याने शेतकरी लक्ष्मण सोनुर्ले यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज तारीख दुपारी उघडकीस आली आहे.
कायर येथील रहिवासी असलेले लक्ष्मण विश्वनाथ सोनुर्ले ६० वर्ष यांचे बाबापूर शिवारात त्यांचे शेत होते. शेतातच त्यांनी वाडा तयार करून ते २४ तास शेतातच राहत होते. या परिसरत जंगली प्राण्यांचा हैदोस असल्याने शेतपिकांच्या सुरक्षे करिता शेताच्या सभोवताल तार बंधुन त्या ताराला जिवंत वेजेचा प्रवाह जोडल्या जात असते. सोनुले यांनी देखील तेच केले. त्यांनीच लावलेल्या विजेचा करंट लागून त्यांच्या मृत्यू झाल्याचे आज उघडकीस आले आहे. पुढील तपास. शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ते सेवा निवृत्त कर्मचारी होते त्यांचे प्रच्यात मुलगा मुलगी असल्याचे कळते.