News Today
वणी :- येथील भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचार कार्यालयात एका पदाधिकाऱ्यांनी कुणबी समाजाप्रती आक्षेपार्थ वक्तव्य केल्याने राज्यातील तमाम कुणबी बांधवांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष तरेंद्र बोर्डे यांचेवर देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे याचे कडून दबाव आणून प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्या जात असल्याची माहिती नागपूर येथील सूत्रांकडून मिळाली आहे.
कुणबी समाजाप्रती असभ्य वक्तव्य करणाऱ्या त्या समाज कंटकाला चक्क भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनीच त्यांना चांगलाच चोप दिला आहे.
दिनांक ४ रोजी भाजपचे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्धाटन संपन्न झाले असता रात्री ८ वाजताच्या सुमारास सुधीर साळी नामक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुणबी समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जावून टिप्पणी केल्याने तेथील उपस्थित आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली हे विशेष होते.
नुकत्याच सहा महिन्यापूर्वी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणूकित भाजपला जोरदार झटका मिळाला होता तेव्हापासून भाजपचे अनेक गैर कुणबी पदाधिकारी सातत्याने कुणबी नेत्यांचा अपमान करीत असल्याची माहिती आहे. त्यांना आवले टेवले मारत आहे. त्यामुळे कुणबी समाजात मोठ्या प्रमाणात भाजपाप्रती सर्वसामान्य जनतेत रोष व्यक्त केल्या जात आहे.
ऐन राज्याच्या विधानसभेच्या निवडणका तोंडावर असताना राज्यातील सर्वात मोठा असलेल्या कुणबी समजालाप्रती अपमानास्पद वक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोठी संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व उमेदवारांची झोप उडाली आहे. त्यामुळे हा प्रकार कलाटणी देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांनी जिल्हाध्यक्ष तरेंद्र बोर्डे यांची समजूत घालून सुधीर साळी यांनी असे वक्तव्य केलेच नाही रागाच्या भरात व गैर समजुतीतून झाल्याचे सर्वांना सांगावे असे दूरध्वनी वरून दबाव वाढल्याची नागपुरी सूत्रांकडून मिळाली आहे.