तेलंगाणा राज्यातीलअसंख्य वाहनाने लोकांची आयात
News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील महायुती प्रणित भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज सलग तिसऱ्यांदा वणी विधानसभा क्षेत्रा करिता आपला उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड मोठ्या रॅलीचे आयोजन करून निवडणूक अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचेकडे नामांकन अर्ज दाखल केला आहे. परंतु या रॅलीत वणी विधानसभेतील मतदार व कार्यकर्त्यांची संख्या नाममात्र दिसून आली पण शेजारील तेलंगाना राज्यातून असंख्य वाहनांनी लोकांची आयात करण्यात आली होती. त्यामुळे रॅलीत तेलगू भाषिक नागरिक निदर्शनास येत असल्याची चर्चा आहे. आ. बोदकुरवार यांच्या जोरदार शक्ती प्रदर्शनाची संपूर्ण हवाच गुल झाली आहे.
या नामांकन रॅलीत थोडी फार गर्दी असली तरी प्रत्यक्षात वणी विधानसभेतील दर्दी मतदार अत्यल्प असल्याने भाजपाला निवडणूक संपन्न होण्याअगोदरच परावभवाची प्रचिती येत आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होती.
रॅलीत सहभागी तेलगू भाषिक लोक इंदिरा गांधी चौकात ?
विधानसभा निवडणुकीचे वारे प्रचंड तापल्या जात आहे. जो तो उमेदवार आपली गर्दी दाखवत आहे. परंतु आयात केलेल्या लोकांची गर्दी ही मतदारांवर कोणताही परिणाम करताना दिसून येत नाही.
आज आ.बोदकुवार हे नामांकन दाखल करणार यासाठी तीन ते चार दिवसाअगोदर पासून याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी शेकडो वाहनाची देखील बुकिंग केल्याची माहिती आहे. परंतु वणी विधानसभेतील गावागावातून मतदारांना वणीत बोलवण्यात आले होते. पण गावागावातील शेतकऱ्यांमध्ये शेत मालाला भाव महायुती व भाजप सरकारने न दिल्यामुळे भाजपाप्रती शेतकरी नाराज आहे. तसेच भाजप व भाजपाच्या उमेदवारांकडे शेतकरी ढुंकूनही बघायला तयार नाही. त्यामुळे मतदार व शेतकरी भाजपच्या रॅलीला येणास देखील तयार होत नाहीत याची जाणीव अगोदरच भाजप पदाधिकाऱ्यांना होती त्यामुळे त्यांनी शेजारील राज्यातील हजारो नागरिकांना त्यांचे वाहने घेवून बोलवण्यात आल्याची माहिती आहे.
तेलंगाणा राज्यातील पासिंग असलेले वाहन
भाजपच्या नामांकन रॅलीत सहभागी झालेले तेलंगणातील असंख्य वाहने वणी येथील शासकीय मैदानाच्या बाजूला असलेल्या खुल्या प्रांगणात पार्किंग केल्या गेली होती. त्यामुळे या वाहनांनी रॅलीत गर्दी दिसावी म्हणून उपस्थिती दर्शविली असावी. तसेच तीन ते चार दिवसांपूर्वी तेलंगाणातील माजी आमदार बंटी सुभाष रेड्डी इथे आ. बोदकुरवार यांचे सोबत मागील चार दिवसापासून नियोजन करीत होते. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांनी वणीतील नामांकन रॅलीत गर्दी करून भाजपची शोभा वाढविल्याने बोलल्या जात आहे. आयात केलेल्या गर्दीने भाजप निवडणूक जिंकण्याचे स्वप्न भंगतील अशी चर्चा होत आहे.
खा. संजय देशमुख आले आणि कुणाच्या आमदारकीचा रस्ता मोकळा करून गेले उघडा लिंक वाचा बातमी
https://wanitoday.com/2024/10/27/खा-संजय-देशमुख-आले-आणि-संज/