प्रदूषणाच्या वाढीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
News Today
दिलीप भोयर
वणी: येथील कोळशाच्या रेल्वे साईडिंगवर मागील १० दिवसांपासून पाणी मारणे बंद असल्याने प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. याबाबत परिसरातील काही नागरिकांनी युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांची भेट घेऊन समस्या सांगितली असता अजिंक्य शेंडे यांनी सायडिंग मॅनेजर यांची भेट घेऊन सोमवार २८ ऑक्टोबर पर्यत जर पाणी मारणे सुरु न केल्यास कोळष्याची एकही गाडी सायडिंगवर येऊ देणार नसल्याची तंबी देवून मॅनेजरला चांगलेच धारेवर धरले होते.
वणी तालुका हा खनिज संपत्तीने भरलेला आहे. या परिसरातून मोठया प्रमाणात कोळसा हा वीज निर्मितीसाठी पॉवर प्लॉटला पाठविला जातो. वाहतुकीसाठी मालगाडीचा उपयोग केला जातो. सदर कोळसा हा वणीतील रेल्वे सायडिंगवर ट्रकने पोहचविल्या जातो. व त्यानंतर मालगाडीत भरून विविध पॉवर प्लांटमध्ये पाठविण्यात येतो. यावेळी धूळ उडू नये म्हणून पाणी मारण्याचे टेंडर सरकारकडून काढल्या जाते. असेच टेंडर वणी सायडिंगबाबतही काढल्या गेले. या ठिकाणी १२ हजार लिटर पाणी टँकर क्षमता असलेल्या टँकरचा उपयोग केल्या जावा असा नियम आहे. परंतु या ठिकाणी ट्रॅक्टर ने पाणी मारल्या जात आहे. आणि हा प्रकार गेल्या १० दिवसांपासून सुरू आहे. जेव्हा टेंडर घेणाऱ्याकडे १२ हजार लिटर क्षमता असलेले वाहन नाही तेव्हा त्याला टेंडर दिला तरी कसा?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील १०दिवसांपासून ट्रॅक्टर ने पाणी मारणे सुरू असतांना सायडिंग इंचार्ज मूंग गिळून गप्प का? असा सवाल उपस्थित होतो.
या सर्व प्रकारबाबत परिसरातील महिलांनी २६ ऑक्टोबर रोजी युवासेना जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांना भेटल्या व अजिंक्य यांनी तात्काळ सायडिंग इंचार्ज श्रवण कुमार यांची भेट घेतली व चांगलीच कानउघडणी केली. तुम्हाला सर्व प्रकार माहीत असतांना या टेंडर घेणाऱ्यावर काय कारवाई केली. लोकांना अनेक आजाराला या धुळीमुळे समोर जावे लागत आहे. श्वसनाचे अनेक आजाराने परिसरातील जनता त्रस्त आहे. व आपण यावर कोणतीही कारवाई करीत नाही. जर सोमवार २८ ऑक्टोबर पर्यत असेच सुरू राहल्यास युवासेनेचे कार्यकते, परिसरातील जनतेला घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. व एकही गाडी सायडिंगवर खाली होऊ देणार नसल्याचे सांगितले. होणाऱ्या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी सायडिंग इंचार्ज व संबंधित अधिक्कार्यांची राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी युवा सेनेचे बादल येसेकर, आर्या राउत, रुद्राक्ष सिडाम, हेमंत चवले, रोहन गंदेवार, महेश बलकी, निलेश कडूकर, आदित्य पेटकर, ईशान झाडे, गोलू बलकी, धनु मडावी, तेजस नागपुरे, किशोर ठाकरे, रोशन काकडे उपस्थित होते.
संबंनधित ठेकेदाराला आम्ही पत्र दिले आहे. व अशीच तक्रार वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला करण्यात आली आहे. सदर ठेकेदारावर कारवाई करण्याचा अधिकार हा माझा नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे. सायडिंग इंचार्ज श्रवण कुमार यांनी सांगितले.