Thursday, February 6, 2025
Google search engine
Homeवणीघरी जावून विश्वास नांदेकरांना शेकडो शिवसैनिकांचे साकडे, राजकीय वातावरण तापले, खा. संजय...

घरी जावून विश्वास नांदेकरांना शेकडो शिवसैनिकांचे साकडे, राजकीय वातावरण तापले, खा. संजय देशमुख उद्या वणीत

खासदार संजय देशमुख उद्या नांदेकरांच्या भेटीला 

News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील विधानसभेची जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेली असली तरी उमेदवारांच्या निवडीबाबत काही शिवसौनीच्या मनातील उमेदवारांची जागा मात्र अजूनही कायम असल्याने आज दुपारी १२ वाजता शेकडो शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या घरी जावून त्यांना साकडे घातल्याने वणीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. त्यामुळे उद्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख हे नांदेकरांच्या भेटीयला येणार असल्याची माहिती आहे.


महाविकास आघाडी कडून शिवसेना (उबाठा) गटाला ही जागा देण्यात आली व संजय देरकर यांच्या नावाची उमेदवार म्हणून निवड झाली. या उमेदवारी करिता माजी आमदार विश्वास नांदेकर हे देखील दावेदारी करीत होते. विश्वास नांदेकर हे १९८९ पासून शिवसेनेत काम करीत असून शिवसेनेचे ते तालुकाध्यक्ष देखील पद भूषविले आहे. त्याच बरोबर ते २००२ च्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.

त्यानंतर त्यांनी २००४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवून आमदार देखील झाले होते. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण विधानसभा मतदार संघात ओळखल्या जाते. त्यांच्या जिल्हा परिषद व आमदारकीच्या कारकीर्द अत्यंत प्रभावी असून अधिकारी वर्ग आजही त्यांच्या नावाने घाबरत असतात. त्याच बरोबर त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या विधानसभा क्षेत्रात सन २००४ ते २००९ असे पाच वर्ष एकही अवैध व्यवसाय देखील त्यांनी चालू दिले नाही. जनतेच्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांची त्यांनी कधीच हयगय गेली नाही. प्रशासनाला सुता सारखं सरळ करून चालविण्याची धम्मक विश्वास नांदेकरामध्ये होती अशी आजही मतदार संघात चर्चा आहे.

ज्या वेळी खोके घेवून बोक्यांनी शिवसेने सोबत गद्दारी केली. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे जिल्ह्यातील एकमेव नेते म्हणाजे विश्वास नांदेकर होते. म्हणून तर आजही तडागळातील शिवसैनिक हा विश्वासभाऊ म्हणेल तेच करायला पेटून उठतात आजही तोच रुबाब व तोच दरारा मतदार संघात त्यांचा कायम आहे.


महाविकास आघाडीला वणी विधानसभा क्षेत्रात विजयाचा झेंडा रोवायचा असेल तर विश्वासभाऊ म्हणेल तोच आमदार व तोच कामदार ठरवण्याची ताकत त्यांच्या शब्दात आहे. याची जाणीव शिवसेनेला असल्याने नाराज असलेल्या शिवसैनिकांना व विश्वास भाऊवर आजही विश्वास टाकणाऱ्या हजारो शिवसैनिकांची मनधरणी करण्यासाठी चक्क खासदार संजय देशमुख व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उद्या वणीत दाखल होणार आहे.

संजय दरेकर यांनी घेतली विश्वास नांदेकर व वामनराव कासावारांची भेट

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी काल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर व काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांची भेट घेतली व पुढील निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची विनंती केली असता दोघांनी ही त्यांना आम्ही सोबत राहू अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे. काँग्रेस , शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस. एकत्रित असल्याने महा विकास आघाडीचा विजय निच्छित असल्याचे बोलल्या जात आहे. विश्वासभाऊ नांदेकर हे जनतेला अभद्र युती सरकारला घालवण्यासाठी निश्चितच महाविकास आघाडीचे उमेदवारालाच निवडणून आणण्यासाठी महत्वाची भुमिका पार पाडतील असा विश्वास शिवसैनिक व सर्व घटक पक्ष जनता व्यक्त करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter