संजय देरकरांचे वणीत जल्लोषात स्वागत, शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह
महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित
News Today
दिलीप भोयर
वणी :- महाविकास आघाडीच्या कोट्यातून वणी विधानसभेची जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेली व संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर होताच मतदरांध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. संजय देरकर हे आज तारीख २५ रोजी दुपारी १२ वाजता मुंबई येथून परत येताच त्यांचे नंदेश्वर देवस्थानासमोर हजारो शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तमाम शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता त्यामुळे महाविकास आघाडीच्या अश्या पल्लवित झाल्या आहे.
मागील चार ते पाच दिवसांपासून महाविकास आघाडीतील वणी विधानसभेचा तिढा सुटता सुटत नव्हता त्यामुळे (उबाठा) गटाचे उमेदवार हे मुब्बई येथे ठाण मांडून बसून होते. शेवटी महाविकास आघाडी कडून वणी विधान सभेची जागा शिवसेना (उबाठा) गटाच्या वाट्याला आली व संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर झाली. तेव्हा पासून ते मुंबईतच मुक्कामी होते. शेवटी पक्षाचा बी. फॉर्म घेवून त्यांनी मुब्बई सोडली. व आज दुपारी ते वणीत दाखल होताच उत्साही शिवसैनिकांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
यावेळी संजय देरकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत सोबत घेवून छञपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्व. बाळासाहेब ठाकरे, संत जगन्नाथ महाराज, पाण्याच्या टाकी जवळील दर्गा, जय परसापेन मंदिरात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ढोल ताशांच्या गजरासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय देरकरांच्या स्वागतानेच विरोधाची हवा गुल
महाविकस आघाडीचे उमेदवार संजय देरकर हे वणीत दाखल होताच वणी विधानसभेतील हजारो कार्यकर्ते स्वयंमपूर्तीने त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. संजय देरकरांच्या जल्लोषात स्वागत बघूनच विरोधाची हवा गुल झाल्याची प्रतिक्रिया मतदारांकडून ऐकायला येत होती.