Tuesday, November 5, 2024
Google search engine
Homeवणीइलेक्ट्रिक वोटिंग मशीन (evm) ही हँक होवू शकते - जगप्रसिद्ध अमेरिकन वैधानिक...

इलेक्ट्रिक वोटिंग मशीन (evm) ही हँक होवू शकते – जगप्रसिद्ध अमेरिकन वैधानिक एलन मस्क यांचा दावा

कुठ गेला निवडणूक आयोग, इलान मस्क वर कारवाई करणार का ?

इलेक्ट्रिक वोटिंग मशीन चोर आहे, निवडणूक आयोग चोरो का सरदार तर नाही ना?

News Today 

दिलीप भोयर

वणी :- जगप्रसिद्ध श्रीमंत आणि वैद्यानिक संस्था चालविणारे अमेरिकेतील नागरिक एलन मस्क यांनी पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वोटिंग मशीन (EVM)  संदर्भात आपली शंका नाही तर खात्री पटवून सांगितले आहे की इलेक्ट्रिक वोटिंग मशीन ही संगणकीय प्रणालीवरुन मतांची हेराफेरी करू शकते किंव्हा त्यातील मतदानात फरक करणे हे शक्य आहे. असा दावा त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केल्याने भारतातील निवडणूक प्रणालीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे EVM मशीन पारदर्शक असून यात कोणताही बदल होत नसल्याचा दावा करणारे निवडणूक आयोग एलन मस्कवर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का ? असा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण झाला आहे.

भारत देश हा एक लोकशाही प्रधान देश असून इथे २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान लागू झाले व देशाला लोकशाही मिळाली आहे. तेव्हा पासून निवडणूक प्रणाली व्दारे देशाचे सरकार निवडल्या जात आहे. निवडणूक प्रणाली मध्ये कागदी मतपत्रिका वापरून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत होती. परंतु सन २००४ पासून भारतात Evm मशीनचा वापर होऊन कागदी मतपत्रिकेला पूर्ण विराम दिला आहे. सन २००४ ते २००९ मध्ये वापरण्यात झालेल्या निवडणुकीत EVM मशीन संदर्भात शंका निर्माण करून भाजपचे  ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. आणि यात गडबली होवू शकते असा निर्वाळा देखील न्यायालयाने दिला आहे. तरी देखील निवडणूक आयोग आजही ही बाब माणायला तयार नाही. आणि निवडणूक आयोगाने आता तर फतवा काढला आहे की, ज्यांच्या कडून  evm मशीन संदर्भात चुकीची अफवा पसरविल्या जाईल त्यांचेवर उचित कारवाई करण्यात येईल. मग एलान मस्क यांनी जे विधान केलं आहे. ते चुकीचे अथवा अफवा पसरविणारे असेल तर त्यांचेवर कारवाई करण्यासाठी भारतातील निवडणूक आयोग धजावल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

एलान मस्क यांच्या मतांप्रमाने जर evm मशीन मध्ये गडबड होत असेल तर देशात निवडणूक प्रक्रिया केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी प्रक्रिया ठरतं आहे. देशाच्या नागरिकांचे भविष्य सरकारच्या हातात असतं आणि जर सरकारमध्ये चोर लुटारू , गद्दार लोक जर EVM मशीन मध्ये गडबड करून सत्तेत बसत असेल तर नीच्छितपणे देशाचे देशाच्या नागरिकांचे आणि देशाच्या भावीपीडीचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे. मागील २० वर्षापासून एकंदरीत देशाच्या सार्वभोमत्वावर विचार केला तर देशाच्या पोशिंदा असलेला शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. कर्जाच्या डोंगरात फासला आहे. ना आरोग्याची सेवा सुरळीत आहे. ग्रामीण भागातील शिक्षण शिल्लक राहिलेलं नाही. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उरला नाही. ना हाताला काम , ना हातात येणार दाम, दिवस रात्र गाळतो घाम तरी मिळत नाही आराम अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

देशाचा कना आणि देशाचा मालक हा मतदार आहे. परंतु अधिकारी व लोकप्रतिनिधी हे मालक बनले आहे. जनहिताचे एक पण निर्णय देशात होताना दिसून येत नाही. मुजोरी आणि दादागिरी वाढली असून अराजक्ता दिवसेंदिवस वाढत आहे. लोकशाही देशातील लोकांचे दररोज कर भरून शोषण केल्या जात आहे. तर सुविधा मात्र शून्य होत आहे. याचा परिणाम कदाचित एवं तर नाही ना ? 

देशातील जातीय व्यवस्था अजूनही जिवंत आहे. वर्ण व्यवस्थेतील उच निचता आजही जिवंत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाबद्दल कोणतेही राजकीय पक्ष बोलत नाही. देशाची शिक्षण प्रणाली खिळखिळी होत आहे. अश्या एक ना अनेक कारणे आणींप्रश्र्न उद्भवत आहे. 

साधा मोबाईल मधील अपडेट इंटरनेटच्या सह्यय्यानी होत असेल तर evm मशीन मधील मास्टरचीप ती देखील इंटरनेटच्या सहाय्याने अपडेट होत नसेल कशावरून इंटरनेटने जगात क्रांती केली केली आहे. पृथ्वी वरून चंद्रावर यान नियंत्रित केल्या जात असेल तर ही evm काय आहे. 

जग प्रसिद्ध वैधानिक संस्था चालविणारा एक वैधानिक एलन मॅस्क जर evm हँक होवू शकते असे व्यक्तव्य करीत असेल तर इच्छित त्यात सत्यता असली पाहिजे. त्याच बरोबर चक्क अमेरिका देखील कागदी मतपत्रिकेवर निवडणुका घेतात आणि सात दिवस त्याची मतगणना चालते. परंतु आमच्या देशात evm ने निवडणुका घेवून ७० दिवस त्या पेटीत बंद करून ७ तासात निकाल देण्यात येते. अस का ? जेव्हा की जनतेला या evm वर भरोसा नाही तेव्हा अधिकारी वर्ग का जबरदस्ती करून evm जनतेच्या मानगुटीवर बसवत आहे. हाचा विचार होणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter