गूरुकुंज मोझरी येथे दिलीप भोयर यांना सन्मानपत्र
News Today
प्रतिनिधी :- रुड्या परंपरा व कर्मकांड नाकारून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहलेल्या ग्रामगीता विचारांचे परिवर्तनशिल कार्य केल्याबद्दल वणी येथील श्रीगुरुदेव सेनेचे अध्यक्ष तथा पत्रकार दिलीप रामदासजी भोयर यांना ग्रामगीता विचार प्रचारक तथा ज्येष्ठ विचारवंत, लेखक ज्ञानेश्वरजी रक्षक नागपूर यांचे हस्ते सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.
शेतकरी समाज हा रूड्या आणि परंपरा व कर्मकांडात गुर्फडून आर्थिक्तेच्या संकटात पडला आहे. त्यामुळे या समाजाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लीहलेल्या ग्रामगीता ग्रंथातील विचारांना अनुसरून जीवन जगणे असे उपदेशित केले आहे. याच विचारांणा अनुसरून दिलीप भोयर हे आपले जीवन जगत आहे. त्यांनी अनेक परिवर्तनशील उपक्रम राबविले आहे.
दिलीप भोयर यांचे वडील रामदासजी भोयर यांचे निधन २०२२ मध्ये झाले होते त्यांनी आपल्या वडिलांचा अत्याविधी हा श्रीगुरुदेव पद्धतीने केला व वडिलांची राख ही कोणत्याही नदीत अथवा तीर्थ स्थानी नेवून कर्मकांड न करता सरळ आपल्या शेतात पुरवली आहे. त्याच बरोबर तेरावी सारखी प्रथा देखील घरातून मोडून काढली आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाची दखल अध्यात्म गुरुकुलचे संचालक तथा ग्रामगीता विश्व विद्यापीठाचे कुलपती रविदादा मानव यांनी घेतली व त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा, कवदुजी वडस्कर , चैत्यन महाराज, सत्यपाल महाराज, भाऊ साहेब थुटे डॉ. उधार महाराजसह अनेक मान्यवर उपस्संथित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील लाखो श्रीगुरुदेव भक्त उपस्थिती होती.