वणी विधानसभेतील मतदांमध्ये वाढली सहानुभूती लाट
News Today
दिलीप भोयर
वणी :- भाजपची उमेदवारी जाहीर होताच वणी विधानसभेतील मतदारांचे लक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे लागले होते. आज ती प्रतीक्षा संपली असून वणीची जागा शिवसेना (उबाठा) गटाला ठरल्याने संजय देरकरांच्या नावाचा शिक्का मोर्तब झाला आहे. त्यामुळे भाजपचे टेंशन आता वाढल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडी कडून काँगेस व शिवसेना (ऊबाठा) गटाची प्रचंड रस्सीखेच सुरू होती यातच खासदार प्रतिभाताई धानोरकरांनी वणी विधानसभा ही काँग्रेसच्या वाट्याला द्यावी असा हट्ट देखील धरला होता. परंतु पक्षश्रेष्ठींनी वणी विधानसभा क्षेत्राचा राजकीय विश्लेषण करून मतदारांच्या मनातील कौल घेवून ही जागा शिवसेना (उबाठा) गटाच्या वाट्याला दिली आहे. त्यामुळे शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये देखील मोठा उत्साह संचारला आहे.
शिवसेना गटा कडूनही माजी आमदार विश्वास नांदेकर , संजय निखाडे यांनी आपली दावेदारी केली होती परंतु कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार संजय देरकरान्ना पसंती दर्शविल्याने पक्षश्रेष्ठीने संजय देरकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.
मागील तीन पंचवार्षिक संजय देरकर हे विधानसभेच्या निवडणुकीत निवडणुका लढवून आहे. त्याच बरोबर त्यांची वणी नगर परिषदेवर नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द आहे. त्याच बरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष देखील आहे. त्यांच्या पाठीशी निवडणूक लढविण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे मतदारांमध्ये देखील मोठी सहानुभूतीची लाट संजय देरकरांप्रती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज असल्याने महाविकास आघाडीचा विजय नीच्छित होणार अशी चर्चा विधानसभेतील मतदारांमध्ये सुरू झाली. त्याच बरोबर भाजपाचा भैया गट हा भाऊ गटाची मनमानी जिरवण्यासाठी सज्ज आहे.
पराभवाच्या छायेत असलेले आ. बोदकुरवार