सप्तखंजरी प्रबोधनाची वैचारिक मेजवानी
प्रतिनिधी (अमरावती)
News Today
गुरुकुंज मोझरी: आज मोबाईल ही महत्त्वाची गरज झालेली आहे आपली मुलं हल्ली मोबाईलच्या प्रचंड अधीन गेलेली दिसून येते मोबाईल हा आपल्या साठी नुकसानदायक देखील ठरू शकतो. तेव्हा मोबाईल वापरताना सावधान असावे असे प्रतिपादन लोकसंत सत्यपाल महाराज यांनी आपल्या सप्तखंजरी प्रबोधनातून केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या स्मृती निमित्ताने
“ग्रामगीता तत्त्वज्ञानाच्या महायज्ञ” व “पालखी पदयात्रा शिबिर महोत्सवाचे” आयोजन श्रीगुरुदेव आध्यात्म गुरुकुल च्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सप्तखंजरी प्रबोधनकारांचे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
ज्यामध्ये रामपाल धारकर ,तुषार सूर्यवंशी ,आकाश ताविडे ,संदीपपाल गीते ,पवन दवंडे व सर्वात शेवटी सप्तखंजरी कीर्तनपरंपरेचे जनक सत्यपाल महाराज यांचे सप्तखंजरी प्रबोधन पार पडले. सर्व प्रबोधनकारांनी आपापल्या शैलीमध्ये प्रबोधन करत अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा यावर कडाडून प्रहार केले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाचे दाखले देत व्यसनमुक्ती राष्ट्रीय एकात्मता पर्यावरण संवर्धन स्त्री सन्मान इत्यादीं विषयावरती प्रबोधन केले.
सुप्रसिद्ध सप्त खंजिरी सप्त खंजरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी सप्त खंजिरीच्या तालावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रीय भजन गाऊन लोकांवरती अक्षरशा गारुड घातले होते. सत्यपाल महाराजांनी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जनसमुदायाच्या अंतःकरणाचा ठाव घेत व्यसनमुक्त व्हा अंधश्रद्धा सोडा लग्न, तेरवी, वाढदिवस सारख्या कौटुंबिक कार्यक्रमात कमीत कमी खर्चामध्ये करा आणि आपले जीवन सुंदर करा असे प्रबोधन केले.
मोबाईल हा विज्ञान युगातला एक मोठा अविष्कार आहे. यातून चांगले आणि वाईट दोन्ही घडू शकते तेव्हा ते वापरणाऱ्यांच्या संस्कारावर अवलंबून आहे.
आपण मोबाईलचा योग्यवापर करायला पाहिजे. आज वृत्तपत्र किंवा टीव्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या दुष्परिणाम आपण बघत आहोत हे दुष्परिणाम आपण टाळले पाहिजे असे आव्हान सत्यपाल महाराज यांनी केले.