Tuesday, November 5, 2024
Google search engine
Homeवणीसिलेंडरच्या गॅस गळतीमुळे घराला लागली आग, आणि मोठी दुर्घटना....

सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे घराला लागली आग, आणि मोठी दुर्घटना….

सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे लागली आग, आणि मोठी दुर्घटना….

News Today
दिलीप भोयर
वणी :- घरगुती सिलेंडर मधील गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील अमलोन येथे घडली. या आगीत घरातील सर्व साहित्य, उपकरणे , धान्य, कपडे जळून खाक झाले असून कोणतीही जीवित हानी न घडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

आमलोन येथील तुळशीराम विठोबा ताजने यांच्या घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडर मधून अचानक गॅस गळती सुरू झाली. आज दुपारी घरची सर्व मंडळी घरी असताना त्यांची नात कु. पायल ताजने (२०) चहा बनविण्यासाठी स्वयंपाक घरात गेली व गॅसची शेगडी सुरू करून लायटर उगारले असता अचानक हवेत पसरलेल्या गॅसने भडका घेतला असता घरातील सर्व मंडळी घरा बाहेर निघाले. त्यामुळे सर्वांचा जीव वाचला परंतु चाय बनविण्यासाठी गेलेली नाती किरकोळ स्वरूपाची जखमी झाली. बघता बघता सर्व गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभ घर राखेत बदलल्याने ताजने कुटुंबाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले परंतु या घटनेत नेमके किती नुकसान झाले आहे. याचा पंचनामा होणे बाकी आहे. स्थानिक नागरिकांनी महसूल तलाठी यांना माहिती दिली असल्याची माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter