जबाबदार कोण ? नगर पालिका, लोकप्रतीनिधी की जनता
News Today
दिलीप भोयर
वणी :- शहरातील अंतर्गत येणारे रस्ते नगर परिषद बांधकाम विभागा मार्फत मागील एका वर्षात शेकडो कोटींचे काँक्रिट पाण्यासारखे ओतून रस्ते बनविल्या जात जात आहे. परंतु या रस्त्याचा दर्जा मात्र प्रचंड नित्कृष असून याकडे प्रशासन व शासनाचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याने या प्रकाराला जबाबदार कोण? नगर पालिका, लोकप्रतिनिधी की जनता असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सोशल मीडियावर स्थानिक नागरिकांनी वायरल केलेले रस्त्याचे फोटो वाचा खालील लिंक https://www.facebook.com/share/p/QzUkRsPoAWbJZKoB/
वणी विभागातील सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद विभाग व इतर विभागामार्फत ज्या ज्या निविदा संबंधित विभागा मार्फत काढल्या जात आहे. त्या सर्व निविदा नियम व अटींना डावलून लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कंत्राटदाराला काम मिळण्यासाठी व्यवस्थितपणे सांभाळून घेवून निविदा अदा करण्यात येत आहे. यात मर्जीतील कंत्राटदार नित्कृष्ट दर्जाचे काम आटोपून कारोडोचे बिल वसून करीत आहे. विकासाच्या नावाखाली भकास कामाचा सुळसुळाट शहरात सद्या सुरू असून यात कमिशन खोरीच्या चिरीमिरीत सर्वच अधिकारी व लोकप्रतिनिधी मतवाल होताना दिसून येत आहे.
याचे जिवंत उदाहरण म्हणजे नांदेपेरा मार्गावरील हेडाऊ हॉस्पिटल समोरील पोस्ट कॉलनीत बांधलेला काँक्रिट रस्ता ओरडुन ओरडुन नित्कृष्ट दर्जेचा पुरावा सादर करीत आहे.
विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून वणी शहरातील बांधकाम झालेले सर्व रस्ते व बांधकाम चालू असलेले सर्व रस्ते हे नित्कृष्ट दर्जेचे रस्ते लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्यासाठी पुरेसे असल्याच्या प्रतिक्रिया वणी शहर व ग्रामीण भागातून उमटत आहे.